MP Hemant Godse, PM Narendra Modi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

PM Narendra Modi in Nashik : आता मला अडचण राहिली नाही : खासदार गोडसे असं का म्हणाले?

Hemant Godse on PM Nasik visit : पंतप्रधान मोदींचा दौरा माझ्या दृष्टीने निवडणुकीसाठी फायद्याचा...

Sampat Devgire

Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्याला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. 'या दौऱ्यात जे जे भेटले त्यांनी आता तुम्हाला अडचण राहिली नाही,' अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे शिवसेना (शिंदे गट) खासदार हेमंत गोडसे म्हणाले. त्यामुळे आता शिवसेनेच्या खासदारांना मोदींच्या करिष्म्यावरच विश्वास असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

नाशिकच्या (Nashik) दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांचा आजचा रोड शो आणि राष्ट्रीय युवक संमेलन या दोन्हींचाही थेट आगामी लोकसभा निवडणुकीचे (LokSabha Election) संबंध जोडला जात आहे. यानिमित्ताने पंतप्रधानांनी राज्यातील लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे, अशी चर्चा आहे. त्याला नाशिकचे खासदार गोडसे यांनीही दुजोरा दिला.

रोड शोसह विविध कार्यक्रमांत खासदार हेमंत गोडसे सहभागी झाले होते. यावेळी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि गोडसे यांच्यात आगामी निवडणुकीबाबत चर्चा झाली. आजचा दौरा एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार म्हणून उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार गोडसे म्हणाले, आजच्या रोड शोला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. यामध्ये महायुतीचे घटकपक्ष असलेल्या सर्व पक्षांचे कार्यकर्ते अतिशय उत्साहाने सहभागी झाले होते. मी रोड शोमध्ये आल्यावर अनेकांनी माझे अभिनंदन करत 'आता तुमची अडचण राहिलेली नाही,' अशा भावना व्यक्त केल्या. आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने ही भावना अतिशय महत्त्वाची आहे.

पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील महत्त्वाच्या विकासाच्या प्रकल्पाच्या लोकार्पणासाठी हा दौरा निश्चित केला होता. त्यात युवकांच्या संमेलनासाठी ते नाशिकला आले. त्यामुळे जनतेमध्ये केंद्रातील व राज्यातील सरकार विकासाचा अजेंडा घेऊन काम करीत असल्याचा संदेश गेला आहे, असा दावाही गोडसे यांनी केला.

(Edited By - Rajanand More)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT