Narendra Modi sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

PM Narendra Modi Nashik Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिक दौऱ्याचे अयोध्या कनेक्शन, 11 दिवसांचे विशेष अनुष्ठान

Roshan More

Nashik : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवार) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. ते काळाराम मंदिरात महाआरती करणार आहेत. तसेच राष्ट्रीय युवा कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. मात्र, आपल्या दौऱ्याच्या काही तास आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशाला उद्देशून एक आॅडिओ संदेश दिला आहे. या संदेशामध्ये त्यांनी नाशिक दौऱ्या मागचे कारण सांगितले आहे.

22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या प्राणप्रतिष्ठाच्या आधी 11 दिवसांचे विशेष अनुष्ठान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) करणार आहेत. या अनुष्ठानाची सुरुवात नाशिकमधील पंचवटीमधून होणार असल्याचे मोदींनी आपल्या संदेशातून सांगितले आहे.

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी साधु संतांनी दिलेल्या सल्लानुसार 11 दिवसांचे विशेष अनुष्ठान सुरु करत आहे. त्याची सुरुवात नाशिकमधील पंचवटीमधून करत असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या संदेशामधून सांगितले. तसेच स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांचा जयंती निमित्त त्यांना नमण करत असल्याचे आपल्या संदेशात मोदींनी म्हटले आहे.

भावना शब्दात मांडू शकत नाही

मी माझ्या भावना शब्दात मांडू शकत नाही, असे मोदी म्हणाले. अनेक पिढ्यांचे स्वप्न साकार होत आहे. मी आज 11 दिवसांचे अनुष्ठान सुरू करत आहे. मी 11 दिवसांचे अनुष्ठान पंचवटी, नाशिक येथून करत आहे. प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने मला भारतीयांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. हे कार्य सिद्धीस देण्यासाठी नागरिकांनी आशिर्वाद द्यावेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या संदेशात म्हणाले.

स्वागतासाठी मुख्यमंत्री हजर

राष्ट्रीय युवा अभियानाच्या निमित्ताने नाशिकमधील भव्य कार्यक्रमाच्या आयोजनापासून केले आहे. या अभियानाचे उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या नाशिक दौऱ्यात त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT