Nashik News : नाशिकमधील अशोक खरात महिला अत्याचार प्रकरण ताजे असतानाच आता नव्या प्रकरणाने नाशिकची छी-थू होण्यास सुरूवात झाली आहे. दिंडोरी तालुक्यातील एका प्रतिष्ठित शाळेत शिक्षकाकडूनच मुलीचे शोषण करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार उघडकीस येताच पालक आणि संतप्त ग्रामस्थांनी शाळेत गोंधळ घातला.
याबाबत दिंडोरी तालुक्यातील वडनेरेभैरव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसूर सादिक मनियार (वय 31, रा. खेडगाव, ता. दिंडोरी) असे संशयिताचे नाव असून तो वडनेरेभैरव येथील सनराईज हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे.
गतवर्षी 10 ते 12 नोव्हेंबर या काळात संबंधित विद्यार्थीनी (वय 15 वर्षे) विज्ञान प्रदर्शनासाठी त्र्यंबकेश्वर येथे गेली होती. यावेळी मनसूर मनियार या शिक्षकाने विद्यार्थिनीचा व्हिडिओ काढला, फोटो काढले. तेव्हापासून हा व्हिडिओ आणि फोटो दाखवून तो या विद्यार्थिनीला ब्लॅकमेलिंग करीत होता. नुकताच हा प्रकार उघडकीस आला असून गावात संताप व्यक्त केला जात आहे.
प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापकांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. संस्थेचे सरचिटणीस आणि पदाधिकारी प्रभावशाली असल्याने त्यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. . त्यामुळेच पालकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आणि पालक आणि ग्रामस्थांनी शाळेत गोंधळ घातल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे.
दोन दिवसांपूर्वी पालकांनी शाळेत जाऊन गोंधळ घालत मुख्याध्यापकांना जाब विचारला. गावात त्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनीही शाळेकडे धाव घेतली. दोन दिवस हे प्रकरण चर्चेत असून गावात तणावाची स्थिती आहे. पालकांच्या तक्रारीनंतर या संदर्भात पोलिसात शिक्षकाविरुद्ध "पोस्को" अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेकडूनही संबंधित शिक्षकाविरोधात कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन मुख्याध्यापकांनी दिले आहे.
राजकीयदृष्ट्या जागरूक असलेल्या वडनेरभैरव गावाची लोकसंख्या मोठी आहे. बागायतदार शेतकरी आणि पंचक्रोशीतील शेकडो विद्यार्थी आणि मुली या शाळेत शिक्षण घेतात. त्यामुळे आता हे प्रकरण तापले आहे. मुख्याध्यापक आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांबाबत संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास वाघ करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.