Nashik News : प्रांताधिकारी पवन दत्ता यांच्या निधनाची खोटी पोस्ट ; 'पिंडदानाचा' कार्यक्रम नाशिक पोलिसांनी रोखला..

Nashik Ring Road Protest : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरासह आसपासच्या गावांमधून जाणाऱ्या 66 किलोमीटरच्या बाह्य रिंग रोडच्या कामाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. जमीन भूसंपादन
Nashik Ring Road Protest
Pinddaan Protest Against Pawan Dutta Stopped by PoliceVicky Kadam, Sakal Photographer
Published on
Updated on

Nashik Politics : नाशिकमध्ये पुढील वर्षी (२०२७) सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराभोवती उभारण्यात येणाऱ्या 66 किलोमीटरच्या बाह्य रिंग रोडच्या कामाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे.

शेतकऱ्यांनी नाशिकचे प्रांत अधिकारी पवन दत्ता यांच्याविरोधात रामकुंड परिसरात आंदोलन सुरु केलं आहे. संतप्त बाधित शेतकऱ्यांचा प्रांताधिकाऱ्यांचे 'पिंडदान' करण्याचा प्रयत्न नाशिक पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून रोखला.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित असलेल्या रिंग रोडसाठी जमीन देण्यास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या रिंग रोडच्या प्रकल्पामुळे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत आहेत, त्यांच्याकडून प्रशासनाचा निषेध करण्यासाठी थेट प्रांत अधिकारी पवन दत्ता यांच्या पिंडदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Nashik Ring Road Protest
Nashik Ring Road : नाशिकच्या शेतकऱ्यांना धक्का ; 66 किमी रिंगरोडसाठी भूसंपादन सुरूच राहणार, उच्च न्यायालयाचा निर्णय

रिंग रोडच्या विरोधात शेतकरी नाशिकच्या रामकुंड परिसरात गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. रिंगरोडसाठी होणारं भूसंपादन तत्काळ थांबवण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. आपल्या जमिनी वाचवण्यासाठी बाधित शेतकरी आंदोलनाला बसले आहेत.

काही दिवसांपूर्वी रिंग रोडच्या जमिनीची मोजणी सुरू असताना प्रांत अधिकारी पवन दत्ता यांनी आंदोलक शेतकऱ्यांना विशेषत: महिलांना मारहाण केल्याचा अत्यंत गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला होता. महसूल आणि पोलीस प्रशासन जमीन मोजणीच्या कामासाठी मातोरी परिसरात गेले होते. यावेळी काही शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देण्यास विरोध दर्शवला. स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे की, प्रांताधिकारी पवन दत्ता यांच्या उपस्थितीत पोलिसांनी शेतकऱ्यांच्या घरात शिरून महिलांना मारहाण केली आणि त्यांना फरफटत बाहेर काढले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

या घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी थेट नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला होता. पवन दत्ता यांना फोनवरही त्यांनी जाब विचारला होता. संजय राऊत यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन वादग्रस्त ठरलेले प्रांत अधिकारी पवन दत्ता यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी लेखी तक्रार केली होती.

सध्या रामकुंड परिसरात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असून सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या नाशिकमध्ये तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी पिंडदानाचा कार्यक्रम रोखला असला, तरी प्रांत अधिकारी पवन दत्ता यांच्यावर कारवाई होईपर्यंत आणि रिंग रोडचा प्रश्न सुटेपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

Nashik Ring Road Protest
Nashik Ring Road : महिला व शेतकऱ्यांना मारहाण, प्रांताधिकारी पवन दत्ता यांच्या अडचणी वाढणार ; मंत्री महाजन स्वत: करणार कारवाईची मागणी

गुन्हा दाखल...

काल, सोशल मीडियावर नाशिकचे प्रांताधिकारी पवन दत्ता यांच्या निधनाबाबत खोटी, आक्षेपार्ह आणि बदनामीकारक पोस्ट प्रसारित करण्यात आली होती. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अफवा पसरवून सामाजिक शांतता भंग करण्याचा आणि जनक्षोभ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या काय?

बळजबरीने भूसंपादन तातडीने थांबविण्यात यावे

भूसंपादनप्रसंगी शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा

जमीन संपादनापूर्वी ग्रामसभेची संपूर्ण संमती घ्यावी

पर्यायी जमीनीची व्यवस्था करताना स्थानिकांना प्राधान्याने रोजगार द्यावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com