Lalit Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Drug Mafia Lalit Patil : ललित पाटील नाशिकच्या 'त्या' मंत्र्याचे नाव घेईल का?

Police Arrested Drug Mafia Lalit Patil From Chennai : नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित माफिया ललित पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे.

Sampat Devgire

Maharashtra Politics News : ड्रगमाफिया ललित पाटील याला अखेर मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेनंतर नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पाटील फरार असताना त्याचे विविध नेत्यांशी नाव जोडले जात होते, आता त्यावरचा पडदा दूर होईल का?, याची उत्सुकता आहे. (Whether Lalit Patil Under political pressure in Drug Case)

नाशिकच्या (Nashik) मोठ्या ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित माफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी (Police) अटक केली आहे. यामध्ये शिवसेनेने (उद्धव ठाकरे) (Shivsena) गटाने दादा भुसे (Dada Dhuse) याच्याशी संबंध असल्याचा आरोप केला आहे.

यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ड्रग्ज प्रकरणात सत्ताधारी राजकीय नेत्यांचे संबंध असल्याचा आरोप करीत भाजपचा एक आमदार यात अडकल्याचे म्हटले होते. शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर थेट आरोप करीत, ललित पाटील याचे भुसे यांच्याशी संबंध असल्याचे आरोप केला होता.

बुधवारी (दि.१८) ललित पाटील याला चेन्नई येथून अटक करण्यात आली. तत्पूर्वी त्याच्या आईने दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन काही राजकीय मंडळी माझ्या मुलाचा एन्काउंटर करण्याची शक्यता असल्याचे म्हटले होते. एका साध्या वेषातील पोलिसाने आपल्याला ललित पाटील याचा एन्काउंटर करणार असल्याचे सांगितले होते.

या सर्व पार्श्वभूमीवर ही अटक झाली आहे. त्यात स्वतः ललित पाटील याने मी पळालो नसून मला फरार होण्यासाठी मदत करण्यात आल्याचेही समोर येत आहे. या स्थितीत काँग्रेसचे नाना पटोले, आमदार धंगेकर, सुषमा अंधारे, खासदार संजय राऊत अशा अनेकांच्या आरोपांचा विचार करता, पाटील कोणत्या नेत्याचे नाव घेतो की ती नावे गोपनीयच राहणार?, ही उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT