Aditya Thackeray On Election : पाच राज्यांच्या निवडणुका घेता; मग चंद्रपूर, पुणे पोटनिवडणूक का नाही ?

Shivsena UBT News : सरकार घाबरत असल्यामुळेच ते निवडणुका घेत नसल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
Aditya Thackeray  News
Aditya Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. (Shivsena News) त्यानुसार राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोराम, तेलंगणा, छत्तीसगडमध्ये या निवडणुका होत आहेत. यावरून ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे.

Aditya Thackeray  News
Aditya Thackeray Visit Nanded : खासदाराने स्वच्छतागृह साफ करायला लावले, त्या अधिष्ठात्यांचा ठाकरेंकडून योग्य सन्मान...

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका घेता, मग पुणे आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक आयोग पोटनिवडणूक का घेत नाही? असा सवाल ठाकरे यांनी केला. (Marathwada) मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) राज्य आणि केंद्र सरकार घाबरत असल्यामुळेच महाराष्ट्रातील चंद्रपूर, पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेत नसल्याचा टोला लगावला.

राज्यात शिवसेना आणि आता राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर ठाकरे आणि शरद पवार गट अधिक आक्रमक झाला आहे. (Maharashtra) एकीकडे राज्यातील जनतेचा आम्हालाच पाठिंबा आहे, आमची शिवसेना खरी असा दावा करणारे मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांची पाठराखण करणारी भाजप निवडणुका का घेत नाही ? असा सवाल ठाकरे गटासह महाविकास आघाडीकडून वारंवार केला जातो.

महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर भाजप-शिंदे आणि आता अजित पवार गटाच्या ट्रिपल इंजिन सरकारने रखडलेल्या महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत कुठलाही निर्णय घेतला नाही. ग्रामपंचायत वगळता गेल्या वर्षभरात राज्यात कुठल्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सरकारने लक्ष दिलेले नाही.

याशिवाय पुणे आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रश्नही तसाच आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार घाबरत असल्यामुळेच ते निवडणुका घेत नसल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. पाच राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात, मग महाराष्ट्रातील पुणे, चंद्रपूरच्या पोटनिवडणुका का घेत नाही? याचा पुनरुच्चारही ठाकरे यांनी केला.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com