Nitesh Rane On Police  Sararnama
उत्तर महाराष्ट्र

Nitesh Rane On Police : नीतेश राणेंच्या विरोधात 'पोलिस बॉईज' आक्रमक; 'त्या' विधानावर कारवाईची मागणी..

Pradeep Pendhare

Ahmednagar Politics News : भारतीय जनता पार्टीचे आमदार नीतेश राणे हे पोलिसांना अपमानित करणाऱ्या भाषणांवर 'पोलीस बॉईज' आक्रमक झालेत. आमदार राणेंविरुद्ध कायदेशीर कारवाईसाठी 'पोलीस बॉईज'ने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली आहे.यावेळी राणेंवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. यामुळे आता राणेंच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे चिन्हे आहेत. (Latest Political News)

गेल्या काही दिवसांपासून विरोधकांवर टीका करताना आमदार नीतेश राणे हे आक्रमक झाले आहेत. आमदार राणे वारंवार प्रक्षोभक भाषा वापर करत आहे आणि ती वाढवली देखील आहे. त्यांनी अलीकडच्या काळात पोलिसांना अपमानीत करणारी काही वक्तव्ये केली आहे. त्यामुळे पोलीस दल अस्वस्थ आहेच, तर त्यांच्या कुटुंबियांमध्ये नाराजीचा सूर आहे. आमदार नीतेश राणे यांचे पोलिसांविषयी केलेल्या या विधानावर आता नगरमधील 'पोलीस बॉईज' असोसिएशन आक्रमक होत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पोलीस बॉईजने निवेदन दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजकीय वरदहस्त असणारे व्यक्ती अलीकडच्या काळात पोलीस आणि पोलीस कुटुंबीयांना कायम खाली दाखवेल, अशी भाषा वापरत आहेत. आमदार राणे यांनी 18 फेब्रुवारीला अकोला जिल्ह्यातील सभेत असे विधान केले आहे. पोलीस माझे काहीच बिघडऊ शकत नाही. माझे बॉस सागर बंगल्यावर बसले आहेत.

आमदार राणे यांच्या म्हणण्यानुसार पोलीस आमच्या राज्यात काय कार्यवाही करणार? पोलिसांना जागेवर राहायचे की नाही, ते माझ्या भाषणाचे चित्रीकरण करून केवळ बायकोला दाखवू शकतील. पोलीस (Police) माझे काही बिघडू शकत नाही. असे विधान करून आमदार राणे यांनी पोलिसांच्या कर्तव्याची चेष्टा केली आहे. पोलीस दलाला खाली दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांच्यासह पोलिसांना अपमानित करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस बॉईज असोसिएशनने केली आहे. पोलीस बॉईज असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रशांत उजागरे यांच्यासमवेत पदाधिकारी निवेदन देताना उपस्थित होते. (Latest Political News)

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT