Manoj Jarange Patil News : 'देशाने पाहिलं नसेल असं आंदोलन...;' जरांगे पुन्हा सरकारच्या नाकीनऊ आणणार !

Maratha Reservation News : पुन्हा एकदा आंदोलनाचे मोहोळ उठणार; कसं असणार आंदोलन?
Manoj Jarange Patil News : Maratha Reservation News
Manoj Jarange Patil News : Maratha Reservation NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalna News : राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीचं विधेयक एकमताने मंजूर करण्यात आलं. यानुसार आता मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती आहे. मात्र, जरांगे यांनी याबाबत सरकारवर फसवणुकीचा आरोप केला आहे. आम्हाला ओबीसीमधून आरक्षण हवं असताना त्या पद्धतीने ते देण्यात आले नसल्याचे सांगत, त्यांनी पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. (Maratha Reservation News)

Manoj Jarange Patil News : Maratha Reservation News
Maratha Reservation : मोठी बातमी ! मराठा आरक्षण विधेयक मंजूर; पण तरीही जरांगे पाटील आंदोलनावर ठाम

जरांगे म्हणाले, "सरकारने आपली घोर फसवणूक केली आहे. त्यामुळे आपल्याला आता राज्यभरात आंदोलन करायचं आहे. मराठा बांधवांनी महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलन सुरू करायचं. सग्यासोयऱ्याची यांच्या प्रतिज्ञापत्राला मान्यतेची अंमलबजावणी दोन दिवसांत करावी, अन्यथा 24 तारखेपासून मराठा समाजाने राज्यभर आंदोलन सुरू करावे. या आंदोलनाचे पोलिसांना दिलेले निवेदन हे कायमस्वरूपी असावे. आंदोलन करताना आपल्या गावागावांतून हे आंदोलन करायचे आहे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"आंदोलन करताना स्वतःच्या हट्टासाठी नाही, तर या सरकारला जेरीस आणण्यासाठी आंदोलन करायचं आहे. महाराष्ट्रभर आदर्श रास्ता रोको आंदोलन करायचं आहे. आंदोलन करताना सकाळी साडेदहा वाजता आंदोलन सुरू करायचे. ज्यांना हे शक्य नाही, त्यांनी सायंकाळी आंदोलन करायचं आहे. पोलिसांच्या नोटिशीला घाबरायचं नाही, परवानगी दिली तर आंदोलन करायचं आहे आणि परवानगी नाही दिली तरीही आंदोलन करायचे आहे, असे जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले.

Manoj Jarange Patil News : Maratha Reservation News
Manoj Jaranage: जो मराठा समाजाच्या बाजूने बोलणार नाही, तो विरोधक समजला जाईल; जरांगे पाटलांनी दिला इशारा

"आता हा आपला शेवटचा मार्ग आहे, पण हे ताकदवान आंदोलन असणार आहे. देशाने बघितलं नसेल असं आपलं आंदोलन असणार आहे. कोणाची गाडी फोडायची नाही आणि जाळपोळ करायची नाही, पण मोठं आंदोलन करायचं आहे. ज्या स्वरूपाचं आरक्षण आम्हाला नको आहे, तशा पद्धतीचं आरक्षण सरकार आम्हाला देऊ पाहत आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण पाहिजे. ओबीसीमधून (OBC) सरकारला आरक्षण देण्यात अडचण काय आहे? असा प्रश्नही जरांगेंनी विचारला.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com