Shivsena leaders at Commissioner Office Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena: शिवसेना नेते कोकणे हल्ला प्रकरणात पोलिस तपास संशयास्पद

Sampat Devgire

नाशिक : शिवसेनेचे (Shivsena) पदाधिकारी बाळासाहेब कोकणे (Balasaheb kokane) यांच्या हल्ला प्रकरणातील तापासाधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते (PI Dnyaneshwar Mohite) यांच्यावर निलंबनाची (Suspension) कारवाई करावी, या मागणीचे निवेदन शिवसेनेतर्फे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे (Jayant Naiknavare) यांना देण्यात आले. (Shivsena deligation given memorandum to police Commissioner Jayant Naiknavre)

बाळासाहेब कोकणे यांच्यावर ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला झाला. त्यात कोकणेंना गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर सिद्धिविनायक इस्पितळात उपचार सुरू असताना, १८ जुलैला त्यांचा जबाबही नोंदविला. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात तत्परता दाखवली नाही, असा आरोप करण्यात आला.

सीडीआर रिपोर्टनुसार गुन्हेगारांच्या पाठीशी असलेल्यांना सहआरोपी करण्यात आलेले नाही. सुजित जीरापुरे, योगेश म्हस्के, जेरी डेव्हिड यांनी या हल्ल्याची सुपारी दिली असल्याचे आमचे म्हणणे असतानाही केवळ ते शिंदे गटाशी संबंधित असल्याने पोलिसांनी सीडीआर रिपोर्टनुसार त्यांच्यावर कारवाई केलेली नाही, असा आमचा आरोप आहे. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये पंचनामे करताना शासकीय पंच घेणे गरजेचे असताना, तपासाधिकाऱ्यांनी तसे केले नाही. मात्र, ३० जुलै आणि १ ऑगस्टला जीवन दिघोळे हा पंच घेतला. तो संशयित सागर दिघोळेचा सख्खा भाऊ आहे. दुसरा पंच अश्‍पाक रंगरेज याचेही संशयिताशी चांगले संबंध आहेत. प्रमोद वंजारी हा पंचही संशयिताचा नातेवाईक आहे. करण राजपूत हा पंच संशयित सूरज राजपूतचा सख्खा भाऊ आहे. गुन्ह्यातील संशयितांना सोडविण्यासाठीच शासकीय पंच न घेता संशयितांचे नातेवाईकच पंच घेतले. तपास अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांच्यावर त्वरित निलंबनाची कार्यवाही करावी. हा निर्णय न झाल्यास आम्हाला पोलिस महासंचालकांकडे दाद मागावी लागेल, असे निवेदनात म्हटले आहे.

महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी गटनेते विलास शिंदे, बाळासाहेब कोकणे, योगेश बेलदार, सुभाष गायधनी, महेश बडवे, नाना पाटील, वीरेंद्र टिळे, राहुल दराडे, संजय परदेशी, राजेश साळुंखे शंतनू दिंडे आदी या वेळी उपस्थित होते.

मला नैसर्गिक न्याय मिळावा, अशी अपेक्षा आहे. मात्र, संशयित गुन्हेगाराचे सख्खे भाऊ पंच म्हणून घेतल्याने मला नैसर्गिक न्याय कसा मिळेल, याचा पोलिस आयुक्तांनी खुलासा करावा. योग्य न्याय न मिळाल्यास पोलिस महासंचालक किंवा उच्च न्यायालयात मला दाद मागावी लागेल.

-बाळासाहेब कोकणे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT