Parambeer singh
Parambeer singh Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

परमबीर सिंग यांचे समृद्धी महामार्गालगतच्या जमिनींशी लींक लावण्यात पोलिस व्यस्त!

Sampat Devgire

नाशिक : मुंबईचे वादग्रस्त पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Absconded Mumbai Police commissioner Parambeer singh) यांचा निकटवर्तीय संजय पुनमिया याची सुनावणी महिनाभऱ लांबली आहे. त्यामुळे पोलिस सध्या नाशिक जिल्ह्यात समृद्धी महामार्गालगत पुनमियाने खरेदी केलेल्या जमिनींच्या मालकीची लींक परमबीर सिंग यांच्याशी लावण्यात पोलिस व्यस्त आहेत.

सिन्नर (नाशिक) येथील नोंदणी उपनिबंधक कार्यालयात शेतकरी असल्याचे बनावट कागदपत्र सादर करून संजय पुनमिया याने मिरगाव व अन्यत्र समृद्धी महामार्गालगत जमिनींची खरेदी केली होती. परमबीर सिंग प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष पथकाने (एटीएस) आपल्या तपासात या जमिनींची माहिती शोधली होती. त्यानुसार त्यांनी नाशिकला सिन्नर व इगतपुरी तालुक्यांतील जमिनींच्या व्यवहारांची चौकशी केली. त्यात सध्या तुरुंगात असलेल्या ठाणे येथील संजय पुनमिया व त्याच्या मुलाच्या नावे समृद्धी महामार्गालगत खरेदी केलेल्या जमिनींची माहीती मिळाली. या जमिनी परमबीर सिंग यांच्या असाव्यात असा पोलिसांचा संशय आहे.२००७ मध्ये बनावट सातबारा उतारे सादर करून त्याने खरेदी केल्या होत्या.

त्याअनुषंगाने त्यांनी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या उपनिबंधक कार्यालयात जाऊन कागदपत्र ताब्यात घेतले. त्यात मिरगाव (सिन्नर) व अन्य जमिनींच्या खरेदीसाठी पुनमिया याने शेतकरी असल्याचे बनावट कागदपत्र सादर केल्याचे स्पष्ट झाले. त्याला तपासासाठी तुरुंगातून ताब्यात घेण्यात आले. पुनमिया हा सराईत आहे. त्याच्यावर अशा प्रकारचा हा बारावा गुन्हा आहे. खंडणी, खंडणी वसुलीसाठी धमकावणे अशा प्रकारचे गुन्हे त्याच्या विरोधात दाखल आहेत.

यासंदर्भात काल त्याला नाशिकच्या न्यायालयात हजर केले असता, पुनमियाच्या वकिलाने मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यात संबंधीत सिन्नरच्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठीच्या अर्जावर कडून २१ ऑक्टोबरला पुढील चार आठवडे स्थगिती दिली. त्यानुसार पुनमियाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. त्याप्रमाणे नाशिकच्या न्यायालयाने देखील आपली सुनावणी चार आठवडे स्थगित ठेवली. या दरम्यान पोलिसांना देखील वेळ मिळाल्याने त्यांनी याबाबत अधिक पुरावे जमा करण्यावर भर दिला आहे. संबंधित जमिनी परमबीर सिंग यांच्याशी संबंधीत असल्याची लिंक लावण्यात ते व्यस्त आहेत.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT