Nashik News : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील 64 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या बुधवारी झाल्या. यामध्ये ठाण्याचे पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांची नाशिकचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे नाशिकच्या सर्व पोलिस यंत्रणेला नवा चेहरा प्राप्त झाला आहे. (Police Transfer News)
गृह विभागाने बुधवारी काढलेल्या आदेशामध्ये नाशिक परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक बीजी शेखर पाटील आणि जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमप यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यापूर्वीच शहराच्या पोलिस आयुक्तपदी संदीप कर्णिक यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे जिल्हा, शहर आणि विभाग अशा सर्व स्तरावर नव्या नियुक्त झाल्याने, पोलिस विभागाला नवा चेहरा प्राप्त झाला आहे. विभागाअंतर्गत सहाय्यक पोलिस आयुक्त आणि पोलीस निरीक्षकांच्या बदल्या दोन आठवड्यापूर्वीच करण्यात आलेले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार झालेल्या या बदल्यामुळे पोलिस विभागात मोठ्या प्रमाणात कांदेपालट झालेली आहे. (Latest Marathi News)
लोकसभा निवडणुकीची तयारी प्रशासकीय स्तरावर सुरू आहे त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने काढलेल्या परिपत्रकात जिल्हा अंतर्गत कार्यरत स्थानिक अधिकारी, प्रलंबित तपासांचे प्रमाण अधिक असलेले आणि दोन वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते लोकसभा निवडणुका निरपेक्षपणे पार पाडण्यासाठी या सूचना देण्यात आल्या होत्या. या परिपत्रकानुसार पोलीस विभागात बहुतांश बदल्या करण्यात आलेले आहेत.
ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने नाशिकचे नवे जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून रुजू होणार आहेत. ते यापूर्वी देखील 2012 ते 14 या कालावधीत नाशिकमध्ये अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. ठाणे शहराचे पोलीस सहायुक्त दत्तात्रय कराळे यांची नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. पोलिस अधीक्षक शहाजी उमप यांना पदोन्नती देण्यात आली असून त्यांची नियुक्ती मुंबईत सहाय्यक उपमहानिरीक्षक पदी झाली आहे. सध्याचे विशेष पोलिस उपनिरीक्षक बी जी शेखर पाटील यांची बदली झालेली, असून त्यांची अद्याप नियुक्ती झालेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.