Param Bir Singh News : माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना दिलासा! खंडणी प्रकरणात सीबीआयचे मोठे पाऊल...

CBI Clean Chit : परमबीर सिंह यांच्यावर धमकावून खंडणी मागितल्या प्रकरणी कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Param Bir Singh
Param Bir Singh Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी ठाणे शहरातील कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फेत केला जात होता. मात्र, सीबीआयने या प्रकरणी परमबीर सिंग यांना क्लीन चीट दिली आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर एका प्रकरणात परमबीर सिंह यांना न्यायालयाने फरार घोषित केले होते. न्यायालयसमोर हजर न झाल्यास त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्याच दरम्यान परमबीर सिंह यांच्यावर धमकावून खंडणी (extortion ) मागितल्या प्रकरणी कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे प्रकरण समोर आले होते. (Param Bir Singh News)

Param Bir Singh
Kalyan Dombivli News : लाखाचे 12 हजार भोवले! रजिस्ट्रार ठाणे ACBच्या जाळ्यात

या गुन्ह्याचा तपास बंद करण्याची अहवला सीबीआयकडून मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. या प्रकरणात आवश्यक ते पुरावे मिळावे नाही. तसेच आक्षेपार्ह असे काही आढळले नसल्याचे मत सीबीआयकडून न्यायालयात मांडण्यात आहे. शिवाय ज्याने हा आरोप केला त्याच्यावर इतरांना अडकविण्याचा इतिहास असल्याचे सीबीआयने म्हटले आहे.

काय होते प्रकरण?

2016 मध्ये ठाण्यामध्ये तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी एका प्रकरणात मध्यस्थी करताना धमकी दिली. तसेच पैसे न दिल्यास मोक्का लावण्याची धमकी देत तब्बल एक कोटी रुपयांची मागणी परमबीर सिंग यांनी केल्याचा आरोप होता. या प्रकरणी सीबीआय चौकशी करत होती मात्र, त्यांना या प्रकरणी ठोस पुरावे आढळले नाहीत. त्यामुळे सीबीआयने तपास बंद करण्याचा अहवाल सादर केला.

(Edited By Roshan More)

Param Bir Singh
Maharashtra Politics महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com