Lalit Panpatil & Vinayak Pande Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Drug Mafia Lalit Patil case : शिवसेनेचे माजी महापौर पांडे यांची पोलिसांकडून चौकशी

Sampat Devgire

Drug Mafia Police Inquiry : एमडी ड्रग्जमाफिया ललित पाटील (पानपाटील) याच्या चालकाशी कनेक्शन असल्याने शविसेनेचे माजी महापौर व नेते विनायक पांडे यांची आज पोलिसांच्या अमली पदार्थ विभागाने चौकशी केली. ललित पानपाटील प्रकरणात राजकीय नेत्याची ही पहिलीच चौकशी झाली आहे. (Police asks Shree pande about Lalit Patil`s Driver Arjun Pardeshi)

नाशिक (Nashik) पोलिसांनी (Police) ड्रग्जमाफिया ललित पानपाटील प्रकरणाची गांभीर्याने चौकशी सुरू केली आहे. मात्र, त्याला राजकीय वळण लागल्याचे आज शिवसेनेच्या (Shivsena) नेत्याच्या चौकशीने स्पष्ट झाले.

यासंदर्भात पोलिसांनी पांडे यांना नोटीस बजावली होती. त्यामुळे कालपासून याविषयी चर्चा सुरू होती. पोलिस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ नियंत्रण विभागाने ही चौकशी केली. एमडी ड्रग्जमाफिया ललित पाटील मूळचा नाशिकचा. त्याने शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याच्याकडे असलेला वाहन चालक हा पूर्वी पांडे यांच्याकडेदेखील चालक म्हणून काम करीत होता, हे तपासातून समोर आले आहे.

पोलिसांच्या चौकशीनंतर पाडे म्हणाले, माझा चालक अर्जुन परदेशी याची ललित पानपाटील याच्या वाहनाशी संबंधित चौकशी झाली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी माझ्याकडे विचारणा केली. त्याविषयी जी जी माहिती हवी होती, ती सर्व माहिती मी दिली.

पांडे म्हणाले, परदेशी हा माझ्याकडे दहा ते बारा वर्षे चालक होता. त्याला मधुमेहाचा आजार असल्याने रात्री त्याला पुरेसे दिसत नव्हते, त्यामुळे मी त्याला कामावरून कमी केले होते. तो माझ्याकडे काम करीत असे, त्यानंतर त्याने काय केले असेल, त्याबाबत मला माहिती नाही.

सध्या मी कोअर कमिटीचा सदस्य आहे. मात्र, मध्यंतरी मी पक्षाच्या कोणत्याही पदावर नव्हतो. त्यावेळी जे कोणी शहरप्रमुख होते, त्यांनी पानपाटील याला पक्षात प्रवेश दिला होता. ती सर्व माहिती पुढे आलेली आहेत. सध्या व्हायरल झालेल्या प्रवेशाच्या फोटोमध्ये विद्यमान पालकमंत्र्यांसह सर्वच नेते आहेत. त्यामुळे माझा या प्रकरणाशी तसेच पानपाटील याच्याशी काहीही संबंध नाही. पोलिसांना जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना मी सर्व सहकार्य करणार आहे, असे पांडे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT