Ram Shinde  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar : कर्जत - जामखेडमध्ये लवकरच राजकीय भूकंप?; राम शिंदेंच्या ट्विटने चर्चेला उधाण

Ram Shinde : कर्जत- जामखेडचे राजकारण पुन्हा तापले

सरकारनामा ब्यूरो

Karjat- Jamkhed : कर्जत- जामखेडमध्ये लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याचे ट्विट भाजप नेते राम शिंदे यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

कर्जत -जामखेडमधील इतर पक्षातील कार्यकर्ते भाजपमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत.

त्यामुळे आता राष्ट्रवादीला खिंडार पडणार की अन्य दुसऱ्या कोणत्या पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार? हे येत्या काही दिवसांतच पाहायला मिळणार आहे.

काय आहे राम शिंदे यांचे ट्विट?

कर्जत -जामखेड जि.नगरमधील इतर पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात इतर पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश. असं ट्विट राम शिंदे यांनी केलं आहे.

राष्ट्रवादीला खिंडार पडणार?

कर्जत- जामखेडमध्ये लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याचे ट्विट राम शिंदे यांनी केले आहे. त्यामुळे जामखेडमध्ये राष्ट्रवादीला खिंडार पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

जर असं झालं तर आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राम शिंदे विधानपरिषदेवर आमदार झाल्यानंतर कर्जत- जामखेडचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT