Shivendraraje News : खासदारांच्या पेंटिंगचा वाद महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादापेक्षा आणि काश्मिरच्या वादापेक्षाही गहण आहे. मुळात खासदारांचे पेंटिंग कुठे काढायचे याबाबत राज्यसभा निर्णय देईल, हा सर्व बालिशपणाचा कळस आहे. यातून काय साध्य होणार आहे, असा शब्दात आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी Shivendraraje Bhosale उदयनराजेंच्या Udayanraje Bhosale पेंटिंगच्या विषयाची खिल्ली उडवली आहे.
खासदार उदयनराजेंच्या पेंटिंगवरुन सध्या सातारा शहरात तणावाचे वातावरण आहे. पालकमंत्री देसाई व उदयनराजे समर्थक यांनी सामोपचाराने हा विषय मिटवला असल्याचे सांगितले जात आहे. या मुद्द्यावरुन भाजपचे सातारा, जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी हा तर बालिशपणाचा कळस असे म्हणत या विषयाची खिल्ली उडवली आहे.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, खासदारांचे पेंटिंगचा हा वाद महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादापेक्षाही आणि काश्मिरच्या वादापेक्षा गहण आहे, असा म्हणावा लागेल. आता खासदार उदयनराजेंचे चित्र कोठे काढायचे याची चर्चा राज्यसभेत होणार आहे. इतका हा मोठा विषय झालेला आहे. खासदारांचे पेंटिंग कुठं काढायचे याबाबत राज्यसभाच निर्णय देईल. मुळात हा सर्व बालिशपणाचा कळस म्हणावा लागेल. यातून काय साध्य होणार आहे.
आपल्या समर्थकांना आवर घालण्याचे काम नेत्यानेच करायचे असते. पण, नेताच रात्रीअपरात्री चित्र कुठे काढायची हे बघत फिरत असेल आणि तेथे पोलिसांशी हुज्जत घालत असेल तर अवघड गोष्ट आहे. हे चित्र काढणारे समर्थक आहेत, त्यांची बुध्दी काय हे सगळ्यांना माहिती आहे. भिंतीवर काढा त्यापेक्षा अजिंक्यतारा किल्ल्यावर चित्र काढा म्हणजे हायवेवरुन दिसेल, असा टोला लगावून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, या बालिशपणाने साध्य काय होणार आहे. हा काय सातारच्या विकासाचा विषय नाही की शहरात अमुलाग्र बदल होणार आहे.
असे सांगून त्यांनी मराठीतील एक म्हण सांगीतली. ते म्हणाले, साठी बुद्धी नाठी.. याप्रमाणे साठीच्या दिशेने सध्या महाराजांची वाटचाल सुरु आहे. ती म्हण लागू होऊ नये, यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना आवर घालावा. विकास कामांसाठी रस्त्यावर उतरावे. पेटिंगसाठी आठवडाभर रात्रीअपरात्री हा प्रकार सुरु आहे. निव्वळ बालिशपणा आणि ‘इगो’ तूनच हा विषय झाला आहे. कार्यकर्त्यांना आवर घालण्याचे काम नेत्याने करावे. त्यासाठी त्यांना परमेश्वराने बुद्धी द्यावी हीच माझी अपेक्षा आहे, असेही त्यांनी नमुद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.