Devidas-Pingle-Shivaji-Chumbhale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivaji chumbhale Politics: शिवाजी चुंभळे यांचा पिंगळे यांच्यावर पलटवार, "देविदास पिंगळे यांच्या कार्यकाळातच भ्रष्टाचार झाला"

Political Shivaji Chumbhale's counterattack on Devidas PingaleDispute between Nashik Market Committee -नाशिक बाजार समितीत राजकारण पेटले; आजी-माजी सभापतींचे परस्परांवर भ्रष्टाचाराचे आरोप

Sampat Devgire

Chumbhale Vs Pingale News: नाशिक बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी देविदास पिंगळे यांच्या विरोधात पलटवार केला आहे. त्यामुळे बाजार समितीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राजकारण रंगले आहे. यानिमित्ताने बाजार समितीच्या कामकाजाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

नाशिक बाजार समितीत नऊ महिन्यात बारा कोटींचा घोटाळा झाला. त्यामुळे बाजार समिती डबघााईस आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी खासदार देविदास पिंगळे यांनी केला होता. त्याला सभापती कल्पना चुंभळे आणि माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी उत्तर दिले आहे.

नऊ महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या विरोधात भाजपचे नेते व माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या पुढाकाराने अविश्वास ठराव दाखल झाला होता. त्यात पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या संचालकांनाच फोडण्यात आले. बहुतांशी संचालक विरोधात गेल्याने पिंगळे यांना सत्ता सोडावी लागली होती.

तेव्हापासून सातत्याने श्री पिंगळे आणि श्री चुंभळे परस्परांवर राजकीय शरसंधान करीत आले आहेत. श्री पिंगळे यांनी बाजार समितीच्या आर्थिक घोटाळा आणि अनियमितता याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केला होता. आधार समिती डबघााईस जात असून तिचे अस्तित्व धोक्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते.

त्याला आता श्री चुंभळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. श्री चुंभळे म्हणाले, मी सत्तेवर आल्यापासून कामकाजात शिस्त आली आहे. संस्थेत सर्वकाही सुरळीत सुरू असून कोणताही भ्रष्टाचार नाही. सत्ता गेल्यामुळेच श्री पिंगळे यांनी आमच्यावर आरोप केले.

श्री पिंगळे यांनी बाजार समितीच्या कंत्राटदाराला जादा रक्कम अदा केली. प्रत्यक्ष झालेल्या कामकाजाचे मोजमाप करण्याची आवश्यकता आहे. मात्र त्याआधीच त्यांनी कंत्राट दाराला जादा पैसे दिले. त्यामुळे बाजार समितीचे नुकसान झाले.

श्री पिंगळे सत्तेत असताना बाजार समितीचे कामकाज पारदर्शक नव्हते. संचालकांना बैठकीचे इतिवृत्त आणि ठराव याबाबत माहिती दिली जात नव्हती. इतिवृत्त पुस्तिकेवर कागद चिकटवून सह्या घेतल्या जात होत्या, असे चुंभळे म्हणाले.

सर्वसाधारण सभेच्या मूळ इतिवृत्तात बदल करण्यात आले. त्यामध्ये ठराव नोंदवून ठेकेदाऱ्याला एक कोटी रुपयाहून अधिक पैसे देण्यात आले. त्यासाठी नियोजन समितीची बनावट बैठक झाल्याचे दाखविण्यात आल्याचा दावा चुंभळे यांनी केला.

या निमित्ताने श्री चुंभळे आणि माजी खासदार पिंगळे यांच्यात पुन्हा एकदा राजकीय आरोप, प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्यांमध्येच जुंपली आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT