Maharashtra Politics : राज्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज मंत्रालयात मंत्री उपसमितीची बैठक झाली. या बैठकीत सबंध राज्याचा आढावा घेण्यात आला. मात्र, चर्चा रंगली ती नांदगाव मतदारसंघाच्या दुष्काळाची. (Minister sub committee meeting in Mumbai on Drought isssue of the state)
मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या दुष्काळाच्या आढावा बैठकीत नांदगावचे (Nandgaon) आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी दुष्काळ जाहीर व्हावा याकरिता पाठपुरावा केला होता. त्याचवेळी बैठकीला माजी आमदार पंकज भुजबळ (Pankaj Bhujbal) यांनीही बैठकीला हजेरी लावत छायाचित्रं काढली.
आमदार कांदे यांनी तालुक्यात दुष्काळ जाहीर होणे आवश्यक असल्याने प्रशासनाऐवजी मी स्वतः मंत्र्यांच्या बैठकीत तालुक्यातील स्थितीचा आढावा सादर केला. शासनाने निश्चित केलेल्या पाचही निकषांमध्ये नांदगाव तालुका बसतो. येथे पिण्याच्या पाण्याचे सर्वाधिक टँकर सुरू आहेत. त्यामुळे आजच तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याचे आश्वासन मिळाल्याचे सांगितले.
आज राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची भेट घेत. नांदगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली, असे माजी आमदार पंकज भुजबळ यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, नांदगाव तालुक्यात अपेक्षेपेक्षा पाऊस कमी झाला आहे. पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्याने असंख्य शेतकऱ्यांना दुबार पेरण्या कराव्या लागल्या आहेत. मात्र, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांतदेखील पाऊस झाला नाही. त्यामुळे बळीराजा आस्मानी संकटात सापडला आहे. त्यामुळे नांदगाव तालुक्यात दुष्काळ घोषित करण्याची मागणी नांदगावच्या जनतेच्या वतीने केली.
याबाबत आजी, माजी दोन्ही आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केलेल्या सहकार्याचा उल्लेखदेखील केला. मात्र, तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला, याचे श्रेय माझेच असे बिंबवण्याचा प्रयत्न त्यातून दिसून आल्याने नागरिकांत त्याची चर्चा रंगली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.