Praful Patel Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Praful Patel on Congress : '...तर 1999 मध्येच काँग्रेसला पूर्णविराम मिळाला असता' ; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला 'त्या' खास ऑफरचा किस्सा!

Praful Patel in NCP Shirdi Shibir : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी इथल्या नवसंकल्प शिबिरात कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

Pradeep Pendhare

NCP Shirdi Navsankalpa Shibir News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेस पक्षाची राज्यात झालेल्या पि‍छेहाटीचा फायदा घेण्याची संधी आहे. महाराष्ट्रात काँग्रेस अतिशय दुबळी झाली असून ती पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी कामाला लागावे, अशी सूचना केली.

याशिवाय 1999 मध्येच काँग्रेसला पूर्णविराम देण्याची संधी होती. ती आपल्याच घाईमुळेच गेली. नाहीतर आतापर्यंत महाराष्ट्रातून काँग्रेस(Congress)संपली असती. तसेच राज्यात फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीचा एकमेव ताकदवर आणि सत्तेत असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आता महायुतीमध्ये राहून पक्षविस्तारासाठी संघटना वाढीवर काम करण्याची सूचना प्रफुल्ल पटेल यांनी शिबिरातील पदाधिकाऱ्यांना केली.

प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांशी शिर्डी इथल्या नवसंकल्प शिबिरात कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधताना, काँग्रेसला टार्गेट केले. राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्या संविधानाच्या मुद्यावर, जम्मू-काश्मीरमधील आर्टिकल 370 (अ) विरोधातील भूमिका, जातीगणनाच्या मुद्यावर प्रफुल्ल पटेल याच्यावर जोरदार टीका केली. महाराष्ट्र्रात काँग्रेस दुबळी झाली आहे. या पोकळीचा फायदा घेऊन, तिथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेचा फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार रुजला पाहिजे, असे काम करा, अशा सूचना केल्या.

'महाराष्ट्रात काँग्रेसची विधानसभा निवडणुकीत(Vidhansabha Election) चांगलीच वाताहत झाली आहे. त्यांच्याच असंघटनामुळे ही त्यांच्यावर वेळ आली आहे. महाराष्ट्रातून काँग्रेस जवळपास संपल्यात जमा होत आहे. ही निर्माण झालेली पोकळीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला पाहिजे. हीच संधी 1999 मध्ये देखील आली होती. परंतु सत्तेत जाण्याच्या घाईने आपला घात झाला. वटवृक्षाखाली राष्ट्रवादी वाढली नाही, असे सांगून प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रातील त्यावेळच्या वाजपेयी सरकारने युतीबरोबर येण्याची ऑफर दिली होती', असा याचा इतिहास सांगितला.

'1999 मध्ये केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली 'NDA' सरकार होते. राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीबरोबर येण्याची ऑफर वाजपेयी यांनी दिली होती. राज्याच्या सत्तेत वाटा देण्याबरोबर केंद्रातील सत्तेत देखील त्यावेळी सहभाग मिळणार होता. त्याचवेळी महाराष्ट्रात काँग्रेसला पूर्णविराम मिळाला असता. पण आपल्याला काँग्रेसबरोबर सत्तेत जाण्याची घाई झाली होती. पण आता तसे होता काम नये. महायुतीत सत्तेत राहून पक्ष संघटना वाढीवर समन्वय ठेवून विस्तार करण्याचे नियोजन नेते, मंत्री, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठेवा', अशा सूचना प्रफुल्ल पटेल यांनी केल्या.

'शिवसेनाUBT'ची भूमिका म्हणजे... -

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीची(MVA) पूर्ण वाताहात झाली आहे. त्यांच्यात कोण काय, करतं आहे, हे अजूनही कळायला मार्ग नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका, 'घर का न घाट का', अशी झाली आहे. हिंदुत्व नाही, मराठी माणूस नाही, असे सगळे मुद्दे शिवसेना ठाकरे सेनेच्या हातातून निसटून गेले आहे. काँग्रेस संपल्यात जमा आहे. आपल्यासारखाच तिकडच्या दुसऱ्या पक्षातील अनेक जण तेथून बाहेर पडण्याच्या तयारी आहे, असे सांगून महायुती महाराष्ट्रासह देशात विकासाचा अजेंडा घेऊन काम करत आहे, याकडे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी लक्ष वेधले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT