Jayant Patil on Prajakt Tanpure Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jayant Patil on Prajakt Tanpure : भाजप प्रवेशावरून मामा-भाच्यात दुरावा? तनपुरेंनी भेटीचं धाडस टाळलं, जयंतरावांनीही मौनच राखलं!

Jayant Patil says Prajakt Tanpure BJP entry could have been avoided discussions had taken place before decision : प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशानंतर राजकीय वर्तुळात चर्चा असताना, मामा जयंतराव पाटील यांच्याशी ना सविस्तर संवाद, ना मनमोकळी चर्चा, नात्यातील अंतराची रंगली चर्चा!

Pradeep Pendhare

Ahilyanagar MLC Election 2026 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाला सोडून भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि त्यांचे मामा जयंतराव पाटील यांच्यातील राजकीय समीकरणांवर पुन्हा चर्चा रंगली आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशानंतर सुरू झालेल्या राजकीय चर्चांना आता जयंतराव पाटील यांच्या नव्या वक्तव्याने आणखी हवा मिळाली आहे.

'माझं बोलणं झालं असतं तर प्राजक्तचा भाजप प्रवेश टळला असता,' असे विधान जयंतराव पाटील यांनी केले आहे. मात्र, प्रवेशापूर्वी प्राजक्त तनपुरे यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्राजक्त तनपुरे सध्या भाजपकडून (BJP) अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार आहेत. त्यांच्या पक्षांतरानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटात आणि जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.

या पार्श्वभूमीवर जयंतराव पाटील म्हणाले, 'प्राजक्त (Prajakt Tanpure) यांच्याशी माझं काहीही बोलणं झालं नव्हतं. त्यांनी त्यांच्या राजकीय विचारांनुसार निर्णय घेतला असेल. ते आमदार राहिले आहेत, मंत्री राहिले आहेत. त्यामुळे निर्णय घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे.'

ते पुढे म्हणाले, 'प्राजक्त तनपुरे यांचा जिल्हा वेगळा आहे. त्यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला, त्यामागे त्यांचा स्वतःचा विचार असेल. मात्र माझ्याशी याबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती.'

दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्राजक्त तनपुरे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते भाजप प्रवेशासाठी मुंबईत दाखल झाले. त्यावेळी त्यांनी शरद पवार आणि मामा जयंतराव पाटील यांना भेटण्याचे धाडस झाले नाही, अशी भावना व्यक्त केली होती. त्यामुळे त्यावेळीही राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले होते.

अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून प्राजक्त तनपुरे मैदानात आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत 4 जून असल्याने निवडणुकीचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते, ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयंतराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. मामा-भाच्यांमधील राजकीय संवादाचा अभाव आणि त्यातून झालेली राजकीय वाटचाल यावर आता नव्याने चर्चा रंगू लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT