Sachin Jagtap Or Prajakt Tanpure : 'मविआ'चा काळ आठवा, तनपुरेंना संधी, जगतापांना डावललं; विधान परिषद उमेदवारीवरून खदखद, राष्ट्रवादी नेत्यांचा सूचक इशारा

Mahayuti candidate Ahilyanagar Local Authorities Constituency MLC election remains undecided NCP leaders intensify their demand Sachin Jagtap candidature against backdrop Prajakta Tanpure likely nomination : अहिल्यानगर विधान परिषदेच्या उमेदवारीवरू महायुतीमधील खदखद समोर आली असून, अरुण जगतापांच्या वारसदारांचा पहिला हक्क असल्याचा सूचक इशारा अजित पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिला आहे.
Sachin Jagtap  Or Prajakt Tanpure
Sachin Jagtap Or Prajakt TanpureSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar MLC Election 2026 : अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीचा उमेदवार कोण असणार, याबाबतची उत्सुकता अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी संपण्याची शक्यता आहे.

ही जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची दाट शक्यता असून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे. मात्र, उमेदवारीच्या अंतिम टप्प्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही या जागेवर जोरदार दावा करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) दिवंगत माजी आमदार अरुण जगताप यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्याला संधी द्यावी, अशी मागणी अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे माजी महापौर गणेश भोसले यांनी केली आहे. याचवेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मंत्रिपद वाटपाचा मुद्दा उपस्थित करत प्राजक्त तनपुरेंवर अप्रत्यक्ष टीकाही केली.

गणेश भोसले म्हणाले, अरुण जगताप हे या मतदारसंघातून दोन वेळा विधान परिषदेवर निवडून (MLC Election) गेले होते. त्या काळात आमदार संग्राम जगताप त्यांच्यासोबत सक्रियपणे काम करत होते. त्यामुळे या निवडणुकीची पूर्ण जाण आणि अनुभव जगताप कुटुंबाकडे आहे. अरुण जगताप यांच्या निधनानंतर या जागेवर त्यांच्याच कुटुंबाचा नैतिक आणि राजकीय हक्क सर्वप्रथम मान्य केला गेला पाहिजे.

Sachin Jagtap  Or Prajakt Tanpure
Congress vs Prajakt Tanpure Battle : महायुतीच्या प्राजक्त तनपुरे गणितात काँग्रेसचा ट्विस्ट! ‘करण ससाणे फॉर्म्युला’मुळे विधान परिषदेत वाढली उत्सुकता

गणेश भोसले यांनी पक्ष नेतृत्वाकडे अहिल्यानगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे ठेवून आमदार संग्राम जगताप यांचे बंधू तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आणि स्थानिक नगरसेवकांचा विचार न झाल्यास मतदानाबाबत वेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. सचिन जगताप यांनी उमेदवारी अर्ज घेतला असून अंतिम दिवशी ते अर्ज दाखल करणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Sachin Jagtap  Or Prajakt Tanpure
Prajakt Tanpure BJP Joining : 'प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश पक्का, विधान परिषद उमेदवारीवरही शिक्का'; मामा जयंतरावांचे प्रयत्न निष्फळ!

सुनील तटकरेंच्या पुत्रप्रेमावर टीका

पक्षाच्या नेतृत्वावर टीका करताना गणेश भोसले म्हणाले, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे स्वतःच्या मुलाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. पक्षातील नेते जर केवळ स्वतःच्या मतदारसंघापुरते मर्यादित राहिले, तर राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था शरद पवार गटासारखी होऊ शकते.

मंत्रिपदाची संधी हुकल्याची खदखद

महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मंत्रिपद वाटपाचा मुद्दा उपस्थित करत भोसले यांनी जुन्या नाराजीला पुन्हा उजाळा दिला. ते म्हणाले, संग्राम जगताप यांना मंत्रिपद देण्यासाठी अजित पवार यांचाही आग्रह होता. मात्र, शेवटच्या क्षणी एका मामाच्या हट्टामुळे त्यांना डावलण्यात आले आणि कारखानदारीशी संबंधित नेतृत्वाला प्राधान्य देण्यात आले.

तनपुरेंच्या पक्षांतरावर जोरदार प्रहार

प्राजक्त तनपुरेंचा उल्लेख करत त्यांनी म्हटले, ज्यांना त्या वेळी संधी देण्यात आली, ते आज कोणत्या पक्षात आहेत हे संपूर्ण राज्य पाहत आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना डावलल्याचे परिणाम पक्षाला भोगावे लागले. ज्यांच्या आशीर्वादामुळे राजकीय उंची मिळाली, त्यांच्याच राजकीय भूमिकेला छेद देण्याचे काम झाले.

महायुतीत उमेदवारी कोणत्या पक्षाला?

विधानपरिषद उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर गणेश भोसले यांच्या वक्तव्यामुळे महायुतीत आणि विशेषतः अजित पवार राष्ट्रवादीत दडपलेली नाराजी पुन्हा एकदा उघडपणे समोर आली आहे. आता महायुतीकडून अंतिम उमेदवारी कोणाला मिळते, याकडे जिल्ह्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com