Sharad Pawar meeting Tanpure Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Prajakt Tanpure ED relief : हिंदुत्वाचा डाव साधला? निवडणूक टाळताच ‘ईडी’ची पिडा कमी; तनपुरे आता पवारांच्या भेटीच्या तयारीत!

Former minister Prajakt Tanpure gets relief in ED probe, likely to meet Sharad Pawar soon after skipping Rahuri bypoll : राहुरी विधानसभा पोटनिवडणूक न लढणारे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात असल्याचे म्हटले आहे.

Pradeep Pendhare

Prajakt Tanpure ED relief : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याभोवती अनेक राजकीय घडामोडी घडल्या. हिंदुत्वाची चाल, भाजपची शिष्टाई अन् पोटनिवडणुपकीत उमेदवारी न करणे, ईडी चौकशीतून मुक्तता आणि आता मी राष्ट्रवादीत, अशी केलेली घोषणा, या मुळे प्राजक्त तनपुरे यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची लवकर भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

माजी मंत्री तनपुरे यांनी तत्पूर्वी, 'मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता काल होता, आजही आहे', असे विधान केलं आहे.

प्राजक्त तनपुरे यांनी, भाजपमध्ये (BJP) जाणार असे मी कधीही म्हटले नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता काल होतो, आजही आहे. फक्त या निवडणुकीपुरती तटस्थ भूमिका घेतली होती. निवडणूक न लढण्याचे कारणे वेगळी आहेत. ते देखील समोर येऊन सांगितली आहे. भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे म्हटलं.

प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी निवडणुकीतील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना, मी पोटनिवडणूक लढवणार नाही, असे वरिष्ठांना अगोदर स्पष्ट केलं होतं. बारामतीप्रमाणेच राहुरीत पक्षाची भूमिका राहिल, असे वाटत होते. पण काँग्रेस इथं उमेदवारीचा आग्रह धरला. त्यामुळे पक्षाला इथं उमेदवार द्यावा लागला. यातून मला शेवटच्या क्षणी पक्षाने उमेदवारी देऊ केली, असे स्पष्ट केलं.

ईडी आणि पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णयाचा दुरान्वये संबंध नाही, हे सांगताना, ईडीच्या केसमध्ये आर्थिक गुन्हे शाखेने एक वर्षापूर्वी क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला होता. काही तांत्रिक बाबींमुळे निकाल यायला वेळ लागला. क्लोजर रिपोर्टच्या आधारे ईडीला पुढील तपास करता येणार नाही, असा ईडी न्यायालयाने निकाल दिला आहे, असे प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केलं.

ईडी न्यायालयाच्या निकालावर तनपुरेंची प्रतिक्रिया

ईडीची केस माझ्या एकट्यावर नव्हती. राज्यातील 50 ते 60 जणांचा समावेश होता. त्यात आर्थिक गुन्हे शाखेने एक वर्षापूर्वी क्लिनचीट देऊन न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. न्यायालयाने दोन-तीन महिन्यांपूर्वी क्लोजर रिपोर्ट स्वीकारला होता. त्याआधारे हा निकाल आल्याचेही प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं आहे.

तनपुरेंचं आक्रमक हिंदुत्व अन् भाजपसमोर आव्हान

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, प्राजक्त तनपुरे यांनी मतदारसंघात आक्रमक भूमिका घेतली होती. हिंदुत्ववादी मुद्यावर ते आक्रमक होत, भाजपलाच आव्हान देत होते. त्यातून ते चर्चेच्या केंद्रस्थानी आले अन् भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तनपुरे यांच्याशी भाजपने संपर्क सुरू केला. त्यांनी निवडणूक अर्ज न भरण्याचा निर्णय जाहीर केला.

शरद पवार यांची लवकरच भेट....

यातच ईडी न्यायालयाचा निकाल त्यांच्या बाजूने आला. आता तनपुरे यांनी मी शरद पवार यांचाच कार्यकर्ता असल्याचे म्हणत पुन्हा साद घातली आहे. आता तनपुरे यांनी शरद पवार यांची लवकरच भेट घेणार असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. शरद पवार यांची प्रकृती कारणास्तव ते राहुरी पोटनिवडणुकीच्या प्रचार मैदानात नव्हते. शरद पवार यांच्या प्रकृतीनिमित्ताने तनपुरे लवकरच त्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT