Prajakt Tanpure : शरद पवारांचा अंदाज खरा ठरला! तनपुरेंनी अर्ज न भरण्याचं केलं जाहीर, कर्डिलेंविरुद्ध मोकाटे फाईट...

Former minister Prajakt Tanpure announces he will not contest the Rahuri assembly by-election, creating a major political twist : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी करणार नसल्याचं जाहीर केलं आहे.
Former minister Prajakt Tanpure
Former minister Prajakt TanpureSarkarnama
Published on
Updated on

Rahuri Assembly Election 2026 : माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची भाजपशी वाढलेली जवळीक पाहाता मुंबईत शरद पवार काहीसे सावधच झालं होते. तसेच त्यांचे नेते देखील सावधतच होते. यातूनच शरद पवार राष्ट्रवादीने ऐनवेळी एबी फाॅर्म काढले.

तोच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही, असं जाहीर करून टाकलं. तनपुरे यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून गोविंद मोकाटे आता भाजपचे अक्षच कर्डिलेंविरोधात लढत देणार असल्याचं जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे.

राहुरी पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. तत्पूर्वी राहुरीत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. अक्षय कर्डिले यांचा भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी, भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तनपुरे यांची भेट घेतली.

चव्हाण आणि विखे पाटील यांनी थेट तनपुरेंच्या (Prajakt Tanpure) कार्यालयात जात ही भेट घेतल्याने, तिथंच भाजपने राजकीय चक्रे फिरवल्याच्या चर्चांना जोर धरला. तसंच तनपुरे बंधू, चव्हाण आणि विखे पाटील या चौघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चा दरम्यान, तनपुरेंची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर फोनवर संवाद साधल्याचं बोललं जातं.

Former minister Prajakt Tanpure
NCP Crisis : तनपुरेंवर भरवसा नाही! शरद पवारांनी दिले दोन 'एबी फाॅर्म', दुसरा फाॅर्म ठाकरेंच्या शिलेदाराला...

मुख्यमंत्री फडणवीस यांचा तनपुरेंशी फोनवर झालेल्या चर्चेला अजून या तीन नेत्यांकडून अधिकृत दुजोरा मिळत नसला, तरी इथंच भाजपने निवडणूक फिरवल्याची चर्चा आहे. या भेटीनंतर प्राजक्त तनपुरे यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जनतेशी बोलून निवडणूक लढवायची की नाही, त्यावर निर्णय घेऊ, असं सांगितलं.

Former minister Prajakt Tanpure
Prajakt Tanpure : राहुरीत नाश्त्यावर रंगली ‘राजकीय खिचडी’! तनपुरेंबरोबर चव्हाण-विखे; फडणवीसांशी फोनवर चर्चा

राहुरीत तनपुरेंच्या या हालचाली सुरू असतानाच, तिकडं मुंबईत शरद पवार राष्ट्रवादी सावध झाली होती. तनपुरेंबरोबर गोविंद मोकाटे यांच्या नावानं शरद पवार राष्ट्रवादीनं एबी फाॅर्म तयार ठेवले. दोन एबी फाॅर्म तयार ठेवण्यामागे शरद पवार यांचीच, रणनीती होती, असे आता सांगितले जात आहे.

पवारांनी तनपुरेंना दिली होती मोठी संधी

प्राजक्त तनपुरे यांना महाविकास आघाडीत असताना, शरद पवार यांनी थेट मंत्रिपदावर संधी दिली होती. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर आणि भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर तनपुरे यांनी मतदारसंघात हिंदुत्वाच्या भूमिकेवर स्वार झाले होते. तेव्हापासून शरद पवार त्यांच्या हालचाली जाणून होते.

शरद पवार सावध अन्...

राहुरी पोटनिवडणुकीत देखील शरद पवार सावध होते. त्यातून गोविंद मोकाटे यांचा दुसरा एबी फाॅर्म तयार ठेवण्यात आला असल्याचे आता सांगितले जात. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला उमेदवार न मिळाल्यास, काँग्रेसने देखील तयारी केली होती. या तयारीमागे देखील शरद पवार होते, अशी चर्चा मतदारसंघात जोर धरू लागली आहे.

काँग्रेसला मैदानात उतरवलं

शरद पवार पक्षाला उमेदवार न मिळाल्यास काँग्रेसकडून उमेदवार देण्याचं महाविकास आघाडीने जवळपास निश्चित केलं होते. परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षातील गोविंद मोकाटे हे महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाकडून तयारी होते. तशी मविआकडून उमेदवारी मिळाली नसती, तरी गोविंद मोकाटे यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीला समोरे जाण्याची तयारी ठेवली होती.

शरद पवारांचा जागेवर कायम दावा

मविआतील काँग्रेस किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाकडे ही जागा देण्याऐवजी गोविंद मोकाटे यांना एबी फाॅर्म देत, शरद पवार यांनी या जागेवर दावा कायम ठेवला आहे. यामुळे शरद पवार यांच्या राजकीय अंदाजाची आता चर्चा जोर पकडू लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com