Prakash Ambedkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Prakash Ambedkar News: प्रकाश आंबेडकरांचे नवे विधान, 'निवडणुकीनंतर दोन्ही ठाकरे मोदींबरोबर जातील'

Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना यांच्या विषयी नवे विधान केले आहे.

Sampat Devgire

Vanchit Aghadi News: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आज सातपूर येथे आले आहेत. त्यांनी करण गायकर या आपल्या उमेदवारासाठी प्रचार सभा घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचार सभांमधून शिवसेने विषयी असली आणि नकली अशी विधाने केली आहेत. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना यांच्या विषयी नवे विधान केले आहे.

आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये रेस लावली आहे. 'रॉयल्टी'साठी ही रेस आहे. या रेस मधून कोण मोठा हे ठरविण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. मात्र लोकसभेची निवडणूक (Loksabha Eletion) झाल्यानंतर हे दोन्ही ठाकरे पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर जातील, असा दावा त्यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काही मुस्लिम समाज बांधवांनी उद्धव ठाकरे यांना तुम्ही मोदी यांच्याबरोबर जाल का?. त्यांच्याशी समझोता कराल का?. असा प्रश्न विचारला होता. त्याला स्पष्ट उत्तर देण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. त्यामुळे उद्धव ठाकरे देखावा करीत आहेत, असे दिसते. असे गोंधळ निर्माण करणारे विधान देखील खेडकर यांनी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सध्या भारतीय जनता पक्षा सोबत आहे. मात्र उद्या अनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रमुख राज ठाकरे झाले तर आश्चर्य व्यक्त करू नये. एकीकडे उद्धव ठाकरे यांना सर्व मदत करायला तयार आहे, असे विधान करायचे आणि दुसरीकडे मनसेचे राज ठाकरे यांना लोकसभेत प्रचार करण्यासाठी मजबूर करायचे असे धोरण सध्या सुरू आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर नव्या राजकीय समि‍करणांची मांडणी होऊ शकेल. अशी शक्यता आंबेडकर यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT