Lok Sabha Election 2024 : काँग्रेस आमदाराच्या हवाल्याने ठाकरेंच्या उमेदवाराचा अडीच लाख मतांनी जिंकण्याचा दावा...

Mumbai South Lok Sabha constituency : मागील 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना सुमारे तीन लाख 21 हजार 870 मते मिळाली होती, तर सावंत यांना चार लाख 21 हजार 937 मते मिळाली होती. त्या निवडणुकीत अरविंद सावंत हे एक लाख 67 मतांनी जिंकले होते. मागील निवडणुकीपेक्षा जास्त म्हणजे अडीच लाख मतांनी निवडणूक जिंकणार आहे, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला आहे.
Arvind Sawant
Arvind SawantSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 18 May : मुंबादेवीचे आमदार अमिन पटेल यांच्यामुळे मागील लोकसभा निवडणुकीत मिलिंद देवरा यांना किती मते मिळाली होती, हे एकदा त्यांना विचारा. ती मुंबादेवी आणि अमीन पटेल आज माझ्यासोबत आहेत, त्यामुळे मागील निवडणुकीत मी एक लाख मतांनी निवडून आलो असलो तरी या निवडणुकीत मी तब्बल अडीच लाख मतांनी निवडून येईन, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मुंबई दक्षिणचे उमेदवार अरविंद सावंत यांनी केला.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून (Mumbai South Lok Sabha constituency) दोन्ही शिवसेनेमध्ये लढत होत आहे. ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांना तिकिट देण्यात आले आहे, त्यांच्या विरोधात शिंदे गटाकडून आमदार यामिनी जाधव (Yamini Jadhav) रिंगणात उतरल्या आहेत. काँग्रेसचे मागील निवडणुकीतील उमेदवार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्याअनुषंगाने विचारण्यात आलेल्या प्रश्नावर सावंत यांनी अडीच लाख मतांनी जिंकण्याचा दावा केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Arvind Sawant
Marathwada Lok Sabha Campaign : मराठवाड्याच्या प्रचारसभांमध्ये घुमला मोदी, शाह, ठाकरे, ओवेसींचा आवाज...

मागील 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना सुमारे तीन लाख 21 हजार 870 मते मिळाली होती, तर सावंत यांना चार लाख 21 हजार 937 मते मिळाली होती. त्या निवडणुकीत अरविंद सावंत हे एक लाख 67 मतांनी जिंकले होते. मागील निवडणुकीपेक्षा जास्त म्हणजे अडीच लाख मतांनी निवडणूक जिंकणार आहे, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला आहे.

सावंत म्हणाले, मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना तीन लाख मते मिळाली होती, त्यात मुंबादेवीची किती मते होती, हे देवरा यांना विचारा. आज ती मुंबादेवी माझ्यासोबत आहे. काँग्रेसचे मुंबादेवीचे आमदार अमीन पटेल आता आमच्यासोबत आहेत. व्यक्तिगत मतं मिळत असतात. पण, निवडणूक ही पार्टीच्या नावाने लढवली जाते. व्यक्ती ही नंतर येते. पक्षाबद्दलचं प्रेम पहिलं असतं, त्यामुळे पक्षाला मतं मिळत असतात.

Arvind Sawant
Modi Cabinet Meeting : मोदींच्या कॅबिनेट बैठका कशा होतात? गडकरींच्या ‘त्या’ किश्श्यासह माजी मंत्र्याने सांगितली इनसाईट स्टोरी

मागील निवडणुकीत मी एक लाख मतांनी जिंकलो असलो तरी या लोकसभा निवडणुकीत मी अडीच लाख मतांनी निवडून येणार आहे, असा दावा शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.

Arvind Sawant
Swati Maliwal Case: आधी मालीवाल यांना मारहाण नंतर फरार, आता केजरीवालांच्याच घरातून केली माजी सचिवाला अटक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com