Eknath Khadse On Pune Rave Party Raid Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Pranjal Khewalkar : खडसेंचा जावई आणखी एका गुन्ह्यात अडकला, प्रांजल खेवलकरांचा पाय आणखी खोलात

Pranjal Khewalkar : प्रांजल खेवलकर यांच्यावर पुण्याच्या सायबर पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. सहमती नसताना चोरुन व्हिडीओ काढल्याचा आरोप एका महिलेने खेवलकर यांच्यावर केला आहे.

Ganesh Sonawane

Pranjal Khewalkar : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर हे सध्या पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे. असे असताना, एका महिलेने सायबर पोलिसांकडे एक तक्रार दाखल केली आहे. ज्यात महिलेने काही गंभीर स्वरुपाचे आरोप केल्याने खेवलकर यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणी खडसेंचे जावई खेवलकरांचा पाय आणखी खोलात जाणार असल्याची शक्यता आहे.

महिलेने सायबर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, खेवलकर यांनी तीच्या समंतीशिवाय तीचे चोरुन फोटो व व्हिडीओ काढले व त्याचा चुकीचा वापर केल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिलेने केलेल्या तक्रारीवरुन प्रांजल खेवलकर यांच्यावर पुण्यातील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याआधी ड्रग्ज प्रकरणामुळे खेवलकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आता सहमती नसताना एका महिलेचे फोटो आणि व्हिडीओ काढल्याप्रकरणी प्रांजल खेवलकर यांच्यावर माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम 66E आणि भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 77 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेशी संबंध ठेवताना, प्रांजल यांनी चोरून व्हिडीओ काढल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. याआधीही प्रांजल खेवलकर यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. ते खराडीतील रेव्ह पार्टीप्रकरणी कोठडीत आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप करत खेवलकरच्या मोबाइलमध्ये शेकडो अश्लील फोटो आणि व्हिडिओ सापडल्याचा आरोप केला होता. त्यात हा नवीन गुन्हा खेवलकरांच्या अडचणीत आणखी वाढ करणार असून एक मोठी कायदेशीर समस्या निर्माण करण्याची शक्यता आहे. सायबर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

रुपाली चाकणकर यांनी पत्रकारपरिषद घेत खेवलकर यांच्यावर अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. ज्यात मानवी तस्करीच्या अनुषंगाने खराडी प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून चौकशी व्हावी अशी मागणी चाकणकर यांनी पोलिस महासंचालक यांच्याकडे केली. मुलींचे नग्न अवस्थेतील फोटो व व्हिडीओ खेवलकरांच्या मोबाईल मध्ये आहेत असा आरोप चाकणकर यांनी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT