Chagan Bhujbal Vs Girish Mahajan : हळू हळू पुढे या, जळगावकडेही लक्ष द्या : भुजबळांना खटकतीय महाजनांची 'नाशिकमधील' ढवळाढवळ

Chhagan Bhujbal : नाशिकच्या पालकमंत्रीपदावरुन नाराजी नाट्य सुरु आहे. छगन भुजबळ यांनी गिरीश महाजन यांना आता जळगावकडे लक्ष द्या म्हणून खोचक सल्ला दिला, त्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
Chhagan Bhujbal & Girish Mahajan
Chhagan Bhujbal & Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal : नाशिकमध्ये 15 ऑगस्ट निमित्ताने मंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजारोहण केलं. पालकमंत्री पदाची घोषणा झालेली नसली तरी गिरीश महाजन हेच अघोषित पालकमंत्री असल्याचं आता बोललं जात आहे. नाशिकमधील स्थानिक नेत्यांना डावलून महाजन यांना ध्वजारोहणाचा मान मिळाला, शिवाय पालकमंत्री पदासाठी त्यांच्याच नावाची चर्चा आहे, त्यावरुन आता नाशिकमध्ये नाराजीनाट्य रंगलं आहे.

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक असलेल्या छगन भुजबळ यांना गिरीश महाजन यांची नाशिकमधील ढवळाढवळ खटकतेय का काय असं वाटू लागलं आहे. त्याला कारणही तसचं आहे.

नाशिकमध्ये ध्वजारोहण केलं पण अधिकृतपणे पालकमंत्री म्हणून तुमच्या नावाची घोषणा कधी होणार यांसदर्भात गिरीश महाजन यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर गिरीश महाजन म्हणाले..आता झेंडावंदन केलं आहे, हळूहळू पुढे जाऊ...गिरीश महाजन यांच्या याच वक्तव्यावरुन भुजबळांनी महाजन यांना खोचक टोला लगावला आहे.

Chhagan Bhujbal & Girish Mahajan
Chhagan Bhujbal : भुजबळांनी धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची ऑफर नाकारली, मला जे करायचं ते नाशिकमध्ये..

भुजबळ म्हणाले, नाशिक हे सर्वांना आवडतं, त्यामुळे या जरुरु हळू हळू पुढे या, पण जळगावला विसरु नका...जळगावकडेही लक्ष द्या. मतदारसंघाला देखील विसरु नका असा टोला भुजबळांनी महाजन यांना लगावला आहे. त्यावरुन भुजबळांना महाजन हे खटकू लागल्याचे बोलले जात आहे.

नाशिकमध्ये छगन भुजबळ हे जेष्ठ मंत्री आहेत. तरीही भाजपच्या मंत्री गिरीश महाजन यांच्यावर ध्वजारोहणाची जबाबदारी सोपवण्यात आली. छगन भुजबळांना गोंदियामध्ये ध्वजारोहणाची जबाबदारी दिली होती. मात्र भुजबळांनी तब्येतीचे कारण देत गोंदियाला जाणार नाही म्हणून सांगितलं. राष्ट्रवादीचे जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असूनही नाशिक सोडून गोंदियाला का जायचं असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला होता. त्यावरुनच भुजबळांची नाराजी स्पष्ट झाली होती.

Chhagan Bhujbal & Girish Mahajan
Congress setback : मनावर दगड ठेवून 45 वर्षांची निष्ठा संपवली, खान्देशात आणखी एका पदाधिकाऱ्याने कॉंग्रेस सोडली..

नाशिकमध्ये कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन हेच कारभार पाहत आहेत. सुरुवातीला पालकमंत्री पदासाठीही महायुती सरकारने गिरीश महाजन यांचेच नाव जाहीर केले होते. त्यात ध्वजारोहणाची संधी देऊन गिरीश महाजन हेच पुन्हा पालकमंत्री असतील असे संकेत भाजपने दिल्याचे बोलले जाते. भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर ध्वजारोहणाची जबाबदारी भुजबळांना मिळावी अशी मागणी भुजबळ समर्थकांकडून केली जात होती. मात्र तो मानही गिरीश महाजन यांच्यामुळे भुजबळांना मिळाला नाही. जेष्ठ मंत्री असूनही त्यांना डावलण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

मुळात राष्ट्रवादीचे जिल्ह्यात सात आमदार आहेत, तीन मंत्री आहेत. एक मंत्री शिवसेनेचा आहे. असे असतानाही जिल्ह्यातील एकाही नेत्याला ध्वजारोहणाची संधी मिळालेली नाही. जिल्ह्यात बाहेरचा व्यक्ती येतो आणि झेंडा वंदन करुन जातो अशा प्रतिक्रिया विरोधकांसह नाशिककरांच्या तोंडून उमटू लागल्या आहेत. त्यात भुजबळ हे तर सर्वात जेष्ठ असल्याने किमान ध्वजारोहणासाठी तरी त्यांचा विचार व्हायला हवा होता. मात्र इथेही महाजनांनी बाजी मारली.

हे सर्व पाहाता मंत्री भुजबळांनी जळगावकडेही लक्ष द्या म्हणून महाजन यांना सूचक सल्ला दिला आहे. भुजबळांनी महाजन यांना लगावलेला हा खोचक टोला महाजनांची नाशिकमधील ढवळाढवळ आता भुजबळांना खटकू लागल्याचे संकेत देणारी असल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com