BJP Politics News: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणूक प्रचारात भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले आहे. राज्यघटनेतील मूलभूत तत्वांविषयी ते बोलतात. याविषयी भाजप नेत्यांचा राग चांगलाच अनावर झाल्याचे चित्र आहे.
भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला आहे. राहुल गांधी राज्यघटनेची प्रत घेऊन निवडणुकीत प्रचार करतात. मात्र त्यांच्या राज्यघटनेतील पाने कोरी आहेत, असा चिमटा त्यांनी घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे राज्यघटना पवित्र ग्रंथ असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस मात्र वारंवार राज्यघटनेचा अवमान होईल, असे वर्तन करते. काँग्रेसने आपल्या सत्ता काळात अनेक राज्यघटनेत बदल केले आहेत.
काँग्रेसने अनेकदा राज्यघटनेचा अवमान होईल असे वर्तन केले आहे. त्याचाच कित्ता राहुल गांधी आता गिरवत आहेत. सध्या राहुल गांधी राज्यघटनेची प्रत घेऊनच निवडणूक प्रचारात भाषणे करीत फिरत आहेत. हे अयोग्य आहे. याबाबत आम्ही लवकरच निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत, असे श्री दरेकर म्हणाले.
राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या कार्यकाळातील झालेले निर्णय आणि कामकाज यातील फरक अतिशय स्पष्ट आहे. जनतेला देखील त्याची जाणीव झाली आहे. महाविकास आघाडीने फक्त विकास योजनांना स्थगिती देण्याचे काम केले.
कोणत्याही चांगल्या योजना महाविकास आघाडीने अमलात आणल्या नाहीत. आम्ही मात्र जनतेच्या हिताचा विचार करून अनेक प्रकल्प सुरू केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लाडकी बहीण योजना ही संकट काळात महिलांना मदत करणारी योजना आहे.
या योजनेमुळे महाविकास आघाडीचे धाबे दणाणले आहे. त्यामुळेच त्यांनी या योजनेबाबत अपप्रचार सुरू केला आहे. एका बाजूला ते म्हणतात पैसे कुठून आणणार असा प्रश्न करतात. दुसरीकडे तेच तीन हजार रुपये देण्याची घोषणा करीत आहेत.
विरोधकांना नेमके काय साध्य करायचे आहे? हेच कळत नाही. मात्र जनतेला हे समजले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व महिला महायुतीच्या पाठीशी उभ्या राहतील. लवकरच महायुतीचे सरकार लाडक्या भावांसाठी देखील योजना आणणार आहे.
त्या योजनोत आठ ते दहा हजार रुपये प्रशिक्षणासाठी देण्यात येतील. बेरोजगार युवकांसाठी प्रशिक्षणाच्या योजना आणून त्यांना स्वयंरोजगार देण्याचा प्रयत्न केला जाईल. महिला युवक शेतकरी यांची काळजी घेतली जात आहे. शेतकऱ्यांच्या विज बिल माफीचा निर्णय झाला आहे. नार-पार, वैनगंगा यांसह 106 सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे, असे दरेकर यांनी सांगितले.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.