Assaduddin Owaisi Politics: ओवैसींचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले,"...हा तर वक्फ बोर्डाविषयी अपप्रचार!

Farooq Shah; AIMIM asduddin Owaisi campaign for Dhule, criticized BJP-आमदार फारुक शहा विजयी झाल्यास धुळे शहरातील सामाजिक सलोखा वाढणार
Asaduddin Owaisi
Asaduddin OwaisiSarkarnama
Published on
Updated on

Asduddin Owaisi News: "एमआयएम" पक्षाचे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी धुळे शहरात प्रचार केला. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना चांगलेच फटकारले. हे उमेदवार कशासाठी निवडणूक लढवतात? असा प्रश्न त्यांनी केला.

धुळे शहर मतदार संघात `एमआयएम` पक्षाचे उमेदवार आमदार फारुक शेख यांची प्रचारसभा बुधवारी झाली. यावेळी पक्षाचे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भारतीय जनता पक्षाचा चांगलाच समाचार घेतला. हा पक्ष केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहे. त्यांनी जनतेसाठी केले तरी काय? असा प्रश्न त्यांनी केला.

भाजप केवळ धार्मिक अपप्रचार करून जनतेचा गोंधळ कसा होईल याकडे लक्ष देत आहे. जनतेचे कोणतेही प्रश्न सोडविण्यात त्यांना रस नाही. केंद्रत सत्तेत असताना त्यांचा कारभार केवळ धार्मिक विद्वेष निर्माण करण्यावर भर देणारा राहिला आहे.

ओवैसी यांनी भाजपकडून वक्फ बोर्ड बाबत राजकारण करून मुस्लिम धर्मियांना धमकवण्याचे काम केले जात आहे. सध्या केंद्रातील सरकार वक्फ बोर्डविषयी मोठ्या प्रमाणात गैरसमज आणि अपप्रचार पसरविण्यात व्यस्त आहे.

Asaduddin Owaisi
Kishor Patil Politics: एकनाथ शिंदेंचे आमदार किशोर पाटील भाजप बंडखोराच्या जाळ्यात अडकले? थेट फडणवीसांनाच लावला फोन!

ज्या जागेवर, शेतात आम्ही नमाज अदा केली ती जमीन मुस्लिमांची होते. जिथे कुराणपठन होईल ती जमीन मुस्लिमांची होते. असे अनेक गैरसमज पसरविले जात आहेत. ज्या जमिनीची मालकी आमची नसेल, ती जमीन वक्फ बोर्डाची कशी होऊ शकते? असा साधा प्रश्न अपप्रचार करणारांना पडत नाही का?

वक्फ बोर्डासारखे प्रश्न पुढे करून नेत्यांना जनतेची दिशाभूल करायची आहे. माझा राज्यातील मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न आहे. महाराष्ट्रात होणारे तीन हजार कोटीचे ड्रायपोर्ट गुजरात मध्ये कसे गेले?

अनेक मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात मध्ये कसे गेले? याचे उत्तर या पक्षांकडे आणि नेत्यांकडे आहे का? हे प्रश्न जनतेपुढे येऊ नयेत, म्हणून ते हिंदू आणि मुस्लिम असा भेदभाव आणि अपप्रचार करून जनतेला फसवत आहेत, असा गंभीर आरोप खासदार ओवैसी यांनी केला

Asaduddin Owaisi
Malegaon Election: धक्कादायक; मालेगावात हवाला रॅकेट? युवकांच्या खात्यात आले सव्वाशे कोटी!

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार अनिल गोटे आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनुप अग्रवाल यांनाही त्यांनी चांगलेच फटकारले. हे दोन्ही उमेदवार फक्त एमआयएम आणि ओवैसी यांच्या विषयी अपप्रचार आणि खोटी माहिती देत फिरत आहेत.

तीनवेळा आमदार असलेल्या माजी आमदार गोटे यांना धुळे शहरासाठी 13 कोटीचे कामही करता आलेले नाही. मात्र आमदार शेख यांनी पाच वर्षात तेराशे कोटींची कामे करून दाखवली. त्यामुळे या शहराचा विकास झाला आहे. आमदार शहा पुन्हा आमदार झाल्यास धुळे शहरात सर्व नागरी प्रश्न सोडविल्याशिवाय ते राहणार नाहीत.

धुळे शहरात शांतता प्रस्थापित होईल. सामाजिक सलोखा निर्माण होईल. या शहरातील दहशत आणि भेदभाव संपुष्टात येऊन समाजात प्रेम आणि आपुलकी वाढेल. त्यामुळे पुन्हा एकदा श्री शहा यांच्यासाठी नव्हे तर धुळे शहराच्या हितासाठी एमआयएम चे उमेदवार फारुक शहा यांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com