Pradip Peshkar
Pradip Peshkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP News; यंदाचा अर्थसंकल्प जनभागीदारीतील विकासाचा आराखडा

Sampat Devgire

नाशिक : (Nashik) राज्यातील (Maharashtra) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारचा पहिला अर्थसंकल्प (Budget) आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात सर्व घटकांचा विचार करून त्यांच्यासाठी आर्थिक तरतुद करण्यात आली आहे. त्यामुळे तो महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा ठरेल, असे भारतीय जनता पक्षाचे (BJP) उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार (Pradip Peshkar) यांनी सांगितले. (BJP leader welcomes Shinde-bjp Government Budget)

ते म्हणाले, हा अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प आहे. ‘पंचामृत’ ध्येययुक्त असलेला अर्थसंकल्प खरोखर जनभागीदारीतून तयार झाला आहे.

या अर्थसंकल्पात शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास डोळ्यापुढे ठेवला आहे.

ते पुढे म्हणाले, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास होईल. रोजगारनिर्मितीसह सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा वर्गाला त्याचा लाभ होईल. राज्याचा पर्यावरणपूरक विकास होईल. खऱ्या अर्थाने अंत्योदयाचा विचार घेऊन केलेला अर्थसंकल्प आहे.

समाजातील सर्व घटकांना म्हणजे महिला, युवा, शेतकरी, असंघटित कामगार, सर्व क्षेत्रातील कष्टकरी तसेच विविध जाती व समाजाच्या अपेक्षा लक्षात घेऊन केलेला हा अर्थसंकल्प खरोखर सर्वस्पर्शी असा म्हणता येईल.

अनेक धार्मिक क्षेत्रातील विकास योजनेबरोबर विविध संतांच्या स्मारकांच्या विकासाची आखणी हि जनभावनेचा केलेला आदर म्हणता येईल. शिक्षण, आरोग्य, पर्यटन, स्वयंरोजगाराला विशेष निधीची तरतूद आहे. व्यापार व उद्योगांना वस्तू व सेवाकर शास्ती अभय योजना दिलासा दायक आहे. त्यामुळे एकंदरीत हा महाराष्ट्राच्या पर्यावरण पुरक विकासाचा आराखडाच होय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT