Girish Mahajan, Eknath Khadse & Gulabrao Patil
Girish Mahajan, Eknath Khadse & Gulabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon District Bank: नगरचा धडा घेत ‘राष्ट्रवादी’ने भाजपला दूरच ठेवले!

Sampat Devgire

Jalgaon News: जिल्हा बँकेचे अध्यक्षपद ‘राष्ट्रवादी’कडे, (NCP) तर उपाध्यक्षपद शिवसेना (शिंदे गट) (Eknath Shinde) यांच्याकडे राहणार आहे. भारतीय जनता पक्ष (BJP) यात सहभाग घेणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे, (Eknath Khadse) शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि राज्याचे ग्रामीण विकास मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी स्पष्ट केले आहे. (Ajit Pawar will take decision on Jalgaon district Bank)

दरम्यान, अध्यक्षपदाचे इच्छुक उमेदवार संजय पवार यांनी गुरुवारी मुंबईत विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार एकनाथ खडसे, तसेच शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याकडे मला पदाची संधी द्यावी, अशी मागणीही श्री. पवार यांनी नेत्यांकडे केली.

जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड शनिवार (ता. ११) होणार आहे. बँकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संचालकाचे संख्याबळ अधिक आहे. त्या खालोखाल शिवसेना शिंदे गटाचे संख्याबळ आहे. शिवसेना ठाकरे गट, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेससोबतच आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर झालेल्या बोलणीप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे तीन वर्षे अध्यक्षपद, तर दोन वर्षे शिवसेनेकडे राहणार आहे.

त्यामुळे आता पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे अध्यक्षपद, तर शिवसेना शिंदे गटाकडे उपाध्यक्षपद राहणार आहे, हे निश्‍चित झाले आहे. तर भाजप या प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचे सांगण्यात आले.

शनिवारी बैठक घेणार : खडसे

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे अध्यक्षपद राहणार आहे. त्याबाबत शनिवारी सकाळी नऊला जळगाव येथील आपल्या निवासस्थानी बैठक घेऊन नाव निश्‍चित करण्यात येईल. उपाध्यक्षपद शिवसेनेकडे आहे. त्यामुळे त्याचा निर्णय त्यांच्यातर्फे घेण्यात येईल.

उपाध्यक्षांचा निर्णय घेऊ : गुलाबराव पाटील

पालकमंत्री व शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की अध्यक्षपद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. त्यामुळे त्याचा निर्णय ते घेतील. उपाध्यक्षपदी आमच्या गटाचा उमेदवार राहील. त्याबाबत आमच्या संचालकांची बैठक घेऊन आम्ही निर्णय घेणार आहोत.

भाजप सक्रिय नाही : गिरीश महाजन

राज्याचे ग्रामविकास मंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन याबाबत म्हणाले, की जिल्हा बँक अध्यक्ष निवडीत भारतीय जनता पक्षाचा कोणताही सहभाग राहणार नाही. आम्ही त्यात सक्रिय राहणार नाहीत.

दरम्यान, जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे संजय पवार, ॲड. रवींद्रभय्या पाटील, प्रदीप देशमुख व माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांची नाव चर्चेत आहेत, तर उपाध्यक्षपदासाठी शिंदे गटातर्फे अमोल चिमणराव पाटील यांचे नाव चर्चेत आहे.

ॲड. रवींद्र पाटील यांनी मुंबईत बुधवारी (ता ७) पक्षाचे अजित पवार, एकनाथ खडसे, जयंत पाटील, तसेच बँकेच्या संचालकांच्या भेटी घेतल्या. चेअरमनपदासाठी आपण इच्छुक असल्याचे आपण नेत्यांना सांगितले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या संचालकांच्या बैठकीत सर्वानुमते चेअरमनपदासाठी निर्णय घ्यावा, असे पक्षाच्या वरिष्ठांनी सांगितले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT