Shivsena News: उद्धव ठाकरे यांनी भुसे यांच्या वाढवल्या अडचणी!

Advay Hiray News: अद्वय हिरे यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करून ठाकरे यांनी मंत्री दादा भुसेंना पुन्हा घेरले
Uddhav Thackeray with Advay hiray
Uddhav Thackeray with Advay hiraySarkarnama
Published on
Updated on

Malegaon News: शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) उपनेतेपदी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे (Advay hiray) यांची नियुक्ती करण्यात आली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे बंदरे विकास मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना त्यांच्याच मतदारसंघात घेरण्यासाठी हा राजकीय डाव टाकण्यात आला आहे. त्यामुळे भुसे यांच्या अडचणी वाढतील,असे बोलले जाते. (Advay hiray`s appointment may creat new political problems for Bhuse)

Uddhav Thackeray with Advay hiray
Dadaji Bhuse News: कांदा प्रश्नी दादा भुसे अॅक्शन मोडवर; नाफेडच्या अधिकाऱ्यांची बोलवली बैठक

मुंबई येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे उपस्थितीत गुरुवारी ही घोषणा झाली. शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी श्री. हिरे यांना नियुक्ती पत्र देऊन शुभेच्छा दिल्या. निवडीबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी श्री. हिरे यांचे अभिनंदन करून तुमच्या संघटन कौशल्याचे हे फलित असल्याचे म्हटले आहे. त्यांनी याबाबत ट्वीट केले आहे.

अद्वय हिरे यांच्या नियुक्तीतून एका बाणात दोन पक्ष्यांची शिकार होणार आहे. यानिमित्ताने शिवसेनेच्या धुळे लोकसभा मतदारसंघाच्या तयारीला चालान मिळेल. त्यात पालकमंत्री व शिवसेनेचे बंडखोर दादा भुसे यांचे चिरंजीव अविष्कार भुसे संभाव्य उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. तर मालेगाव बाह्य मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व खुद्द दादा भुसे करीत आहे.

Uddhav Thackeray with Advay hiray
Maharashtra News : शिंदे सरकारचा अजब कारभार; नुकसानीचे पंचनामे सुरु असतानाच ३६ तहसिलदारांच्या बदल्या

त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. यातून शिवसेनेला देखील दादा भुसे यांचे परंपरागत विरोधक अद्वय हिरे यांच्या माध्यमातून संघटन वाढविण्यास मदत होणार आहे. त्यासाठीचे पहिले शक्ती प्रदर्शन आगामी शिवगर्जना मेळाव्यातून होईल.

मालेगाव येथे २६ मार्चला म.स.गा.महाविद्यालयाच्या मैदानावर शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्याचे निमंत्रण शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. युवानेते अद्वय हिरे यांनी मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले.

या सभेस संजय राऊत, सुषमा अंधारे, विनायक राऊत, सुभाष देसाई, अंबादास दानवे, भास्करराव जाधव आदी प्रमुख नेत्यांसह शिवसेनेचे महाराष्ट्रातील मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com