Dindori Loksabha Election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Narendra Modi Politics : मोदींच्या सभेआधी पायपीटच फार!

Sampat Devgire

Dindori constituency 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पिंपळगाव बसवंत येथे सभा होत आहे. या सभेसाठी उभारलेल्या व्यासपीठावर विकसित भारत निर्धार सभा अशी टॅग लाईन होती. कडक उन्हातील सभेला देखील प्रचंड गर्दी होती.

दिंडोरी मतदारसंघाच्या भाजपाच्या उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार (Bharati Pawar) आणि नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) , धुळे लोकसभेचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी आज पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांची सभा होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सभेसाठी येणाऱ्या नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना सभेच्या ठिकाणापासून अर्धा किलोमीटर अंतरावरच थांबविण्यात आले. त्यामुळे बराच वळसा घालून लोकांना सभेला यावे लागले. दुपारी बाराला भर उन्हात झालेल्या या पायपीटमुळे ज्येष्ठ नागरिकांची बरीच गैरसोय झाली . त्यानंतर पाण्याच्या बॉटलही पोलिस काढून घेत होते. त्यामुळे सभेला येणाऱ्यांची चांगलीच कसरत झाली. त्यामुळे सभेला यायचे तर मॉर्निंग वॉक करून आले नाही तरी चालण्यासारखे आहे.

या सभेसाठी बरीच तयारी करण्यात आली होती. सभेचे व्यासपीठ प्रचंड भव्य अशा स्वरूपात बांधण्यात आले आहे. बारा फूट उंच आणि 120 फूट रुंद स्टेजवर विकसित भारत निर्धार सभा अशी टॅग लाईन होती. त्यावर विविध छायाचित्रे आणि 'फिर एक बार मोदी सरकार' असे घोषवाक्य होते. आधुनिक भारताच्या विविध प्रतीकांची छायाचित्रे होती. त्यात केंद्रस्थानी कांदा डाळिंब द्राक्ष आणि अन्य शेतमालांचे छायाचित्र होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT