Rohit Pawar Politics : शेतकर्‍यांच्या रोषामुळे मोदींच्या सभेचे ठिकाण बदलले?

Dindori LokSabha Election Rohit Pawar on Bharati Pawar and Narendra Modi : आमदार रोहित पवार यांची दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारासाठी सभा झाली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama

Rohit Pawar Vs BJP News: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची आज पिंपळगाव बसवंत येथे सभा होत आहे. भाजपच्या उमेदवार डॉ भारती पवार (Bharati pawar) यांच्या प्रचारासाठी ही सभा होत आहे. या सभेविषयी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी टीका केली आहे.

आमदार रोहित पवार यांची दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांच्या प्रचारासाठी सभा झाली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आमदार पवार म्हणाले, शेतकर्‍यांमध्ये केंद्र सरकारने राबविलेल्या निर्यात बंदी आणि अन्य निर्णय याचा मोठा रोष आहे. शेतकऱ्यांचा हा संताप यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) वेळोवेळी व्यक्त झाला आहे.

या रोषाला सामोरे जाण्याचे धाडस भारतीय जनता पक्षामध्ये नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सभेचे ठिकाण त्यांना बदलावे लागले. भाजपच्या राजकारणाचे हे परिणाम आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या वर देखील आमदार पवार यांनी टीका केली. ते म्हणाले, खरे तर बावनकुळे यांच्या विचाराचा फुगा आता फुटला आहे. त्यामुळे ते काहीही विधाने करतात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्रात जे राजकारण केले ते लोकांना आवडलेले नाही.

Rohit Pawar
Pune Lok Sabha Election 2024 : निवडणूक खर्चात 'लाखोंची उड्डाणे'; आढळराव अव्वल तर कोल्हे, धंगेकरही नाहीत मागे...

अन्य पक्षांची तोडफोड करून सत्ता मिळवणे हे त्यांचे ध्येय आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्ता हवी असते. त्याबाबत लोकांमध्ये संताप आहे. त्यामुळेच लोकांचा भाजपवरील (BJP) विश्वास उडाला आहे.

पुणे मतदारसंघ (Pune Constituency) भाजपचा बालेकिल्ला असल्याचा दावा केला जातो. मात्र येथे भाजपचे लोक देखील मतदानाला बाहेर पडले नाहीत. त्यामुळे अंध भक्तांना तोंड दाखवायला ही जागा राहिलेली नाही.

आमदार पवार यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर पैशाचे वाटप झाल्याचा आरोप केला. महायुतीने कितीही सत्ता आणि पैशांचा दुरुपयोग केला तरी काहीही उपयोग होणार नाही. राज्यात भाजपला जास्तीत जास्त 16 ते 18 जागा मिळतील. शिंदे गटाला 1 ते 3 जागा मिळतील. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची पार्टी कोरी राहिल, असा दावाही त्यांनी केला.

Rohit Pawar
Lok Sabha Election 2024 : लक्षद्वीप कुणाचं? दादांचं की साहेबांचं? घड्याळ चालणार की तुतारी वाजणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com