Kolhapur Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kolhapur News: 'समाजा समाजात भांडण लागेल, आरक्षणाच्या नावाखाली शासन मज्जा बघेल'; कोल्हापुरात डोणे बाबांची भाकणूक

Political News: कृष्णात डोणे-वाघापूरकर यांनी केलेली राजकीय भविष्यवाणी चर्चेचा विषय बनली

Rahul Gadkar

Kolhapur News: राज्यात आरक्षणावरून घमासान सुरू आहे. मराठा समाजानंतर, ओबीसी, धनगर, आदिवासी समाजाने आक्रमक भूमिका घेतल्या आहेत. सरकारकडून मात्र सर्वांना आश्वासने दिली जात आहेत. यावरूनच कृष्णात डोणे-वाघापूरकर यांनी केलेली राजकीय भविष्यवाणी चर्चेचा विषय बनली आहे.

पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र वाघापूर (ता. भुदरगड) येथील कृष्णात डोणे बाबा यांची भाकणूक पार पडली. ज्योतिर्लिंग देवालयाच्या प्रांगणात जागरानिमित्त झालेल्या भाकणूककार कृष्णात डोणे-वाघापूरकर यांनी राजकीय, सामाजिक, धार्मिक, शेतीविषयक भविष्यावाणी केली. कृष्णात डोणे महाराजांनी, वाघापूर गावचा महिमा वाढत जाईल, असे सांगून साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत होणार, भगवा झेंडा राज्य करील, अशी भाकणूक केली.

'शासन मज्जा बघेल...'

राज्यातील सद्यःस्थितीवर भाष्य करताना कृष्णात डोणे-वाघापूरकर म्हणाले, "आरक्षणाच्या नावाखाली शासन मज्जा बघत राहील. समाजा समाजात भांडणे लागतील. देशात मोठा कायदा येणार आहे. शेतीचे भाव वाढत जातील. दुष्काळामुळे शेतकऱ्यांपुढे मोठ्या समस्या निर्माण होतील", अशी डोणे महाराज यांनी भविष्याबाबत चेतवानी दिली आहे.

निसर्ग चक्रावर बोलताना कृष्णात डोणे म्हणाले, "नदीबाईला कुलपं पडतील. मेघाची कावड गैरहंगामी हाय. मेघाच्या पोटी आजार असतील. पाऊसपाणी पीक यांचं कालमान बदलत चालले आहे. कोरोनापेक्षा मोठी महामारी येईल. दीड महिन्याचे धान्य मोठ्या प्रमाणात येईल. तांबडी रास मध्यम पिकेल. ज्यांच्याकडे धान्य तो शहाणा होईल. वैरणीला सोन्याची किंमत येईल, धान्यांची व वैरणीची चोरी होईल. बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल, बैलाची किंमत बकऱ्याला येईल. उसाचा काऊस होईल, साखरेचा भाव तेजीत राहील".

"उसाच्या कांड्याने व दुधाच्या भांड्याने राज्यात गोंधळ उडेल, मायेचं लेकरू मायेला ओळखायचं नाही, चालता बोलता मनुष्याला मरण येईल, माझं माझं म्हणू नका, माणसाला माणूस खाऊन टाकील, येतील येतील लाकडाची डोरली येतील, तरुण पिढी वाईट मार्गाला लागेल, येईल येईल राज्य गुंडांचे येईल, महागाईचा भस्मासुर येईल, सामान्य माणसाला जगणं मुश्कील होईल", असा इशाराही त्यांनी दिला आहे.

उन्हाळ्याचा पावसाळा होईल अन् पावसाळ्याचा उन्हाळा होईल, नदीकाठावरील जमीन ओसाड पडल, गर्वानं वागू नका, गर्वाचं घर खालीच होईल, होईल होईल भूकंप होईल, जंगलातील प्राणी गावात येईल, गावातील माणूस जंगलात जाईल", अशी भाकणूक पार पडली.

Edited by Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT