Loksabha Election 2024 : मराठवाड्यासाठी महाविकास आघाडीचं ठरलं ? लोकसभेच्या जागावाटपाचं असं असणार गणित

Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray : आघाडीतील तीन पक्ष मराठवाड्यातील आठ लोकसभा निवडणुका लढविण्याची शक्यता आहे.
Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray
Sharad Pawar, Nana Patole, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mahavikas Aghadi : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. पण राज्यात व मराठवाड्यात प्रमुख मित्र पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादीच्या पदरात कोणत्या जागा पडणार, याचा अद्यापही ताळमेळ नाही. मात्र, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस या प्रमुख मित्र पक्षांचे जागांबाबत जवळपास ठरले असल्याची माहिती आहे, तर फक्त जालना लोकसभा काँग्रेस की, राष्ट्रवादी असा खल सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी देशपातळीवर विरोधकांनी 'इंडिया आघाडी'ची मोट बांधली आहे, तर राज्यात महाविकास आघाडी आहे. आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व शिवसेना (ठाकरे गट) या तीन पक्षांसह वंचितसह इतर पक्षांचा समावेश होणार आहे.

मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आठवड्याच्या सुरुवातीलाच मराठवाड्यातील लोकसभेच्या जागांबाबत आढावा घेतला आहे. आघाडीतील तीन पक्ष मराठवाड्यातील आठ लोकसभा निवडणुका लढविणार असल्याचे निश्चित झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray
Manoj Jarange Patil News: जरांगे पाटलांच्या आंदोलनाची पुढची दिशा कशी असणार ? आठ मोठ्या घोषणा

यामध्ये बीड व हिंगोली राष्ट्रवादी काँग्रेस, नांदेड व लातूर काँग्रेस, तर परभणी, धाराशिव व छत्रपती संभाजीनगर या तीन लोकसभा शिवसेना (ठाकरे गट) लढविणार असल्याचे जवळपास ठरले आहे. केवळ जालना लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीत बोलणी सुरू आहे. विजयाचे मेरीट असणारा उमेदवार कोणाकडे यावरून या जागेबाबत निर्णय होणार आहे. जालन्याच्या जागेवरून बीडबाबतही बदल होईल, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्या खासदार रजनी पाटील यांचे गांधी कुटुंबीयांशी जवळकी व पवारांशी असलेले ऋणानुबंध पाहता त्या बीडबाबत इच्छुक असतील, तर तसाही विचार होऊ शकतो, असे पक्षातील सूत्रांचे मत आहे. मग, जालना राष्ट्रवादी काँग्रेस लढवू शकतो. पक्षाने आतापासूनच उमेदवारांना संकेत द्यावेत, म्हणजे तयारीला वेळ मिळेल, असे जिल्ह्यातील पक्षांच्या नेत्यांनी पवारांकडे म्हणणे मांडले आहे.

Edited by Ganesh Thombare

Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray
Ahmednagar Politics: सुजय विखेंची डोकेदुखी वाढली ? अजितदादांच्या गटाची नगर दक्षिणच्या जागेसाठी चाचपणी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com