Ajit Pawar family news Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar family news : अजितदादांचं निधन, आजोळ निःशब्द! नगर काॅलेजमध्ये शिक्षण, जगधने, कदम, चव्हाण अन् पाऊलबुधे परिवार अस्वस्थ...

Ajit Pawar Demise: Relatives in Ahilyanagar Rahuri Distressed : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे, विमान अपघाती मृत्यूने अहिल्यानगर जिल्ह्यातील त्यांचे नातेवाईक निःशब्द झाले.

Pradeep Pendhare

Ajit Pawar Ahilyanagar Rahuri : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे, विमान अपघाती मृत्यूने अहिल्यानगर जिल्ह्यातील त्यांचे नातेवाईक निःशब्द झाले. अजितदादा यांचे अहिल्यानगरमधील नगर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना, शहरातील सबजेल चौकात राहणार्‍या त्यांच्या मावशीकडे राहायचे.

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा हे त्यांचे आजोळ म्हणजे, मामाचे गाव होते. तर श्रीरामपूरला आत्या मीनाताई जगधने! त्यामुळे अजितदादांचे निधनाच्या वृत्ताने जगधने, कदम, चव्हाण अन् पाऊलबुधे परिवाराला अस्वस्थ व निःशब्द करून गेलं आहे.

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भगिनी श्रीरामपूरच्या मीनाताई जगधने या अजितदादांच्या आत्या. मीनाताईंच्या पुतण्याला अहिल्यानगरचे माजी आमदार नाथ पाऊलबुधे यांची कन्या नम्रता दिली आहे. अहिल्यानगर मनपाचे माजी नगरसेवक विनित पाऊलबधे यांची बहीण नम्रता श्रीरामपूरच्या जगधने परिवारात दिली असल्याने विनितही अजितदादांचे लांबचे नातेवाईक झाले.

अजितदादांच्या (Ajit Pawar) आई आशाबाई यांचे माहेर राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इथले. त्यामुळे आईचे भाऊ असणारे अण्णासाहेब कदम हे अजितदादांचे मामा, तर माजी आमदार चंद्रशेखर कदम हे मामेभाऊ. आशाताईंची मोठी बहीण प्रभावती या अहिल्यानगरच्या चव्हाण कुटुंबात दिल्या होत्या. त्यामुळे या कुटुंबातील संजय चव्हाण हे अजितदादांचे मावस भाऊ. अशा सगळ्या जगधने, कदम, चव्हाण व पाऊलबुधे परिवारावर आज अजितदादांच्या जाण्याने शोककळा पसरली.

अजितदादा नगरला होते शिकायला...

1977-78मध्ये अकरावी अन् बारावीच्या शिक्षणासाठी अजितदादा अहिल्यानगरला मावशी चव्हाणांकडे राहिले होते. त्यावेळी चव्हाण कुटुंब माळीवाडा परिसरातील भाऊसाहेब फिरोदिया शाळेजवळील सबजेल चौकात राहायचे. त्याचवेळी दादांचे भाऊ श्रीनिवास पवारही दादांसमवेत होते. श्रीनिवास पवार हे दादा चौधरी विद्यालयात शिकायला होते. बारामतीहून आजोळी देवळाली प्रवरा इथं जायचे असेल, तर दादा आधी अहिल्यानगरला मावशीकडे 8-8 दिवस थांबायचे, अशी आठवण त्यांचे मावस भाऊ संजय चव्हाण यांनी जागवली. लहानपणापासून दादा शिस्तीचे भोक्ते होते. त्यांचे सारे काम वेळेवर होत असे. त्यावेळेपासूनच त्यांचा स्पष्टवक्तेपणा आम्ही अनुभवला आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

अहिल्यानगर शहर विकासाला चालना दिली...

अजितदादा नातेवाईक असल्याने अहिल्यानगरला आल्यावर माझ्या घरी नेहमी यायचे. त्यांनी मला राजकीय ताकद दिली अन् नगरमध्ये जी विकास कामे दिसतात, त्यासाठीचा निधी त्यांनीच दिला, अशा आठवणी माजी नगरसेवक विनित पाऊलबुधे यांनी जागवल्या. मी महापालिकेत विरोधी पक्ष नेता असताना प्रोफेसर कॉलनी चौकातील प्रमोद महाजन अभ्यासिकेच्या निर्मितीसाठी त्यांनीच मला निधी दिला, व त्यातून ही वास्तू उभी राहिली, असेही विनितने सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT