Objectionable post on Ajit Pawar : लाज नाही, शरम नाही! अजितदादांच्या निधनावर शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याची आक्षेपार्ह पोस्ट, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा पोलिस ठाण्यासमोर उद्रेक

Dinesh Fatangare Expelled from Shinde Sena for Objectionable Post on Ajit Pawar Demise : अजित पवार यांच्या निधनावर आक्षेपार्ह पोस्ट करणारा, एकनाथ शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संगमनेरमध्ये आक्रमक झाले होते.
Objectionable post on Ajit Pawar
Objectionable post on Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Sangamner Shiv Sena controversy : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळ आहे. बारामतीसह राज्यभरातील सत्ताधाऱ्यांसह विरोधक तसेच पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते अन् सर्वसामान्य लोकांकडून शोक व्यक्त करत, अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत आहेत.

पवार कुटुंबिय शोकाकुल असताना, त्यांच्या सांत्वनासाठी देशभरातील नेते संपर्क करत आहेत, त्यावर शोक व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया देत आहेत. परंतु एकनाथ शिंदे शिवसेनेच्या संगमनेर शहराध्यक्षाने आक्षेपार्ह पोस्ट केल्याने खळबळ उडाली आहे. शिंदेसेनेच्या शहराध्यक्षाची ही पोस्ट व्हायरल होताच, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले, कायदेशीर कारवाईसाठी थेट संगमनेर पोलिसांसमोर ठिय्या आंदोलन केलं.

अजित पवार (Ajit Pawar) यांचे आज सकाळी विमान दुर्घटनेत निधन झाले. यानंतर राज्यात शोकाकुल वातावरण झालं. पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह राज्य आणि देशातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच संघटनांनी शोक व्यक्त करत आहेत. अजित पवार यांच्यावर उद्या शासकीय इतमामात अंत्यविधी होणार आहे. यातच समाज माध्यमांवर अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

यातच, एकनाथ शिंदे शिवसेनेचे (Shivsena) संगमनेर शहराध्यक्ष दिनेश फटांगरे याने आक्षेपार्ह पोस्ट केल्याचं समोर आलं. यावरून राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यक्रमांचा संताप अनावर झाला. शिंदेसेनेच्या शहराध्यक्षाविरोधात कायदेशीर कारवाईसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संगमनेर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांकडून सुरूवातीला प्रतिसाद मिळत नसल्याने, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संताप अनावर झाला.

Objectionable post on Ajit Pawar
Manoj Jarange reaction : असं काही झालं आहे, यावर मनोज जरांगेंचा विश्वास बसेना! खात्री करण्यासाठी अनेकांशी संपर्क अन् बातमी...

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संयम सोडत, संतापाला वाट मोकळी करून दिली. कारवाईची मागणी करत, पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. यानंतर वरिष्ठ पोलिसांनी अन् ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मध्यस्थीची भू्मिका घेतली. पोलिसांनी यानंतर प्रकाराची नोंद घेतली.

Objectionable post on Ajit Pawar
Ajit Pawar Death: अजितदादांसोबत सावलीसारखे असणारे अंगरक्षक विदीप जाधव कोण होते? कर्तव्यदक्ष अन् शिस्तप्रिय म्हणून होती ओळख

दरम्यान, संगमेनरचे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी अजितदादांचा निधनावर प्रतिक्रिया देताना सकाळीच शोक व्यक्त केला होता. त्याचवेळी दुसरीकडे दिनेश फटांगरे याची सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट समोर आली. या प्रकाराची आमदार खताळ यांनी गंभीर दखल घेत, दिनेश फटांगरे याच्यावर पक्षपातळीवर कारवाईचा आदेश दिला.

अहिल्यानगर उत्तरचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते पाटील यांनी, आमदार अमोल खताळ यांच्या आदेशानुसार, दिनेश फटांगरे याची संगमनेर शहराध्यक्षपदावर तत्काळ हकालपट्टी केली. पक्षपातळीवर ही कारवाई झालेली असली, तरी संगमनेर पोलिस काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com