Ahilyanagar police passport check case : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशी पळाला आहे. लंडन की, स्विझरलँड याचा गोंधळ सुरू असतानाच, त्याने पासपोर्ट मिळवला कसा? हा प्रश्नाचं उत्तर मिळवणे पुणे पोलिसांना संशोधनाचा विषय बनला आहे.
परंतु निलेश घायवळ याने पासपोर्ट मिळवण्यासाठी पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडे अर्ज करताना अहिल्यानगर शहरातील पत्ता दिला होता. अहिल्यानगर पोलिसांकडे हे प्रकरण व्हेरिफेक्शनसाठी आलं होतं. आता त्याची माहिती समोर आली असून, यात देखील मोठी चिटिंग केल्याचं समोर आलं आहे.
पुण्यातील (Pune) कुख्यात गुंड निलेश घायवळ याने पासपोर्ट मिळवण्यासाठी दाखल केलेल्या अर्जावर अडनावात बदल केला होता. घायवळचं, 'गायवळ' केलं होतं. निलेश बन्सीलाल गायवळ असं संपूर्ण नाव दिलं होतं. पासपोर्टसाठी पत्ता सांगताना, अहिल्यानगरमधील गौरी घुमट, आनंदी बाजार, माळीवाडा मार्ग असा दिला होता.
तसंच पासपोर्ट पत्ता व्हेरिफेक्शनसाठी निलेश घायवळ याने अर्जासोबत आधारकार्ड, पॅनकार्ड आणि भाडे करार पत्र जोडलं होतं. आधारकार्डवर देखील 'गायवळ' असंच नाव होतं, असा दावा अहिल्यानगर पोलिसांनी (Police) केला आहे. पॅन कार्डवर पत्ता नसतो. तरी देखील ते जोडले होते. तसंच भाडे करारपत्र जोडण्यात आले होते.
पासपोर्ट व्हेरिफेक्शनसाठी पोलिस स्वतः घरी जाऊन चौकशी करायचे. त्यावेळी केलेल्या चौकशीत, पोलिसांना काहीसा संशय आला होता. परंतु संबंधित पत्यावर निलेश घायवळ ऊर्फ गायवळ आढळून आला नाही. त्यामुळे कोतवाली पोलिसांनी अहिल्यानगर पोलिस अधीक्षक कार्यालयामार्फत पासपोर्ट प्रकरणावर 16 जानेवारी 2020 रोजी प्रतिकूल म्हणजेच "Not Available", असा रिमार्क करून पुणे विभागीय पासपोर्ट कार्यालयास पाठवले.
आता हे प्रकरण समोर आल्यानंतर निलेश घायवळ याने पासपोर्ट मिळवण्यासाठी 'गायवळ' हे अडनाव धारण केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याच्याकडे आता असलेला पासपोर्ट नेमका कोणत्या नावे आहे, घायवळ की, 'गायवळ'? अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलिसांनी घायवळ याच्या पासपोर्ट व्हेरिफेक्शनवर "Not Available", असा रिमार्क मारला आहे. मग त्याला पासपोर्ट कसा मिळाला? कोणी मदत केली? राजकीय हस्तक्षेप झाला की, पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयातून मदत झाली? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
दरम्यान, अहिल्यानगर पोलिसांकडे निलेश घायवळ याने पासपोर्ट व्हेरिफेक्शनसाठी आधारकार्ड दिले होते. त्यावर अडनाव 'गायवळ' होते, असा अहिल्यानगर पोलिसांचा दावा आहे. यानुसार घायवळ याने 'गायवळ' नावाने बनावट आधारकार्ड काढले का? आडनावात बदल करण्यासाठी आधारकार्डवर हेराफेरी केली का? असे देखील प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.
तसंच पत्ता व्हेरिफेक्शनसाठी भाडे करार दिला होता. हा भाडे करार खरंच झाला होता का? झाला तर कोणासोबत झाला? कुठे झाला? की तो देखील बनावट होता? कारण अहिल्यानगर पोलिस व्हेरिफेक्शनमध्ये संबंधित पत्यावर कोणीच आढळून आलं नाही. याशिवाय संपर्कासाठी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर देखील संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे निलेश घायवळ ऊर्फ गायवळ याचे पासपोर्ट प्रकरणाला आत वेगळं वळण लागू लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.