Nilesh Ghaywal gangster case Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Ghaywal gangster case : नीलेश घायवळची दहशत; आरपीआय नेत्यावर प्राणघातक हल्ला, चार महिन्यानंतर सहभाग उघड

Pune Gangster Nilesh Ghaywal Booked Under Atrocity Act : पुण्याचा कुख्यात गुंड नीलेश घायवळ आणि त्याचे साथीदार 14 जणांविरोधात जामखेड पोलिस ठाण्याच गुन्हा दाखल झाला आहे.

Pradeep Pendhare

Jamkhed police station FIR : परदेशात पसार होण्यापूर्वी कुख्यात गुंड नीलेश घायवळ आणि त्याच्या गँगच्या गुंडगिरीचा प्रताप अहिल्यानगरमध्ये समोर आला आहे. आरपीआय नेते सुनील साळवे, त्यांच्या कुटुंबियातील सदस्यावर 24 ऑगस्टमध्ये प्राणघातक हल्ला केला होता.

या हल्ल्यात नीलेश घायवळ याचा सहभाग निष्पन्न असल्याचे पोलिस तपासात समोर आला आहे. भारतीय न्याय संहितेमधील तरतुदीनुसार, आर्म अ‍ॅक्ट आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार 14 जणांविरोधात गुन्ह्याची नोंद घेण्यात आल्याची पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केली.

जामखेड (Jamkhed) तालुक्यातील नान्नज इथं 24 ऑगस्टला रात्री आरपीआय नेते सुनील साळवे यांचे कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यात सुनील साळवे यांचे कुटुंबिय जबर जखमी झाले होते. जामखेड पोलिस ठाण्यात याप्रकरणी त्यावेळी भारतीय न्याय संहितेतील कलम 109 नुसार, अ‍ॅट्रॉसिटी आणि आर्म अ‍ॅक्टनुसार एकूण 14 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात दोघे अज्ञात व्यक्तींचा सहभाग होता.

या जीवघेणा हल्ल्यामध्ये तलवार, काठ्या व इतर प्राणघातक शस्त्रांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला होता. या गुन्ह्यात जामखेड पोलिसांनी (Police) तपास करत, तांत्रिक पुराव्यामध्ये गुंड नीलेश घायवळ याचा सहभाग असल्याचे समोर आले. नीलेश घायवळविरुद्ध ठोस पुरावे पोलिसांना मिळाले.

नीलेश घायवळ हा मुळचा सोनेगाव (ता. जामखेड) इथला रहिवासी असून, पुणे शहरामध्ये त्याचे नावाने गँग कार्यरत आहे. या गँगविरुद्ध खून करणे, खंडणी मागणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, दहशत माजविणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

आरपीआय नेत्यावर प्राणघातक हल्ला

जामखेड पोलिस ठाणे इथं दाखल गुन्ह्यांमध्ये नीलेश घायवळ व त्याचा साथीदार ऋषी गायकवाड याने कट रचून सुनील साळवे आणि त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांवर साथीदारांमार्फत धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या गुन्ह्यात जामखेड पोलिसांना घायवळ अन् गायकवाड याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने, या दोघांचा गुन्ह्यात समावेश करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

घायवळ विरोधात ब्लू काॅर्नर नोटीस

या गुन्ह्यात आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली असून, उर्वरीत आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. नीलेश घायवळ याचे पासपोर्ट प्रकरण चांगलेच गाजले. बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवला. यानंतर तो परदेशात पसार झाला आहे. पुणे पोलिसांना नीलेश घायवळ विरोधात ब्लू काॅर्नर नोटीस देखील बजावली आहे.

चार महिन्यानंतर घायवळचे आरोपीत नाव

जामखेड पोलिसांनी सुरवातीलाच नीलेश घायवळ याचे नाव का घेतले नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. आरपीआय नेत्यावर प्राणघातक हल्ला ही गंभीर बाब आहे. तब्बल चार महिन्यानंतर घायवळ आणि त्याच्या साथीदाराचा गुन्ह्यात समावेश करण्यात आला आहे. गुन्ह्यात समावेश होऊ नये म्हणून, पोलिसांवर राजकीय दबाव होता का? यावर आता चर्चा सुरू झाल्या आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT