Devayani Farande Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Devayani Farande Politics: फडणवीसांच्या शिलेदारानं ‘प्राईम’ टायमिंग’ साधला; ‘NMC’ कारभारावर कडाडला, ‘बीओटी’चा घाट उधळणार

BOT project opposed in NMC: महापालिकेचे शहरातील मोक्याचे भूखंड खाजगी विकासकांच्या घशात घालण्याचा धक्कादायक प्रकाराला केला विरोध.

Sampat Devgire

Nashik BJP News: प्रशासकीय राजवटीत महापालिकेच्या मौल्यवान भूखंडांची विलेवाट लावण्याचे प्रकार होत आहेत. यानिमित्ताने सार्वजनिक जागा खाजगी विकासकांच्या घशात घातल्या जात आहेत. सत्ताधारी भाजपा आमदारानेच या विरोधात सरकारला इशारा दिला आहे.

नाशिक महापालिकेच्या शहरातील काही मोक्याच्या जागा बीओटी तत्त्वावर देण्याचे ठराव झाले आहेत. प्रशासकांच्या मार्फत हे सर्व गुपचूप पणे सुरू आहे. त्याला भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी विरोध दर्शविला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांनी नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी हा दौरा महत्त्वाचा आहे. मात्र या दौऱ्याआधीच सत्ताधारी आमदाराकडूनच सरकारला घरचा आहेर मिळाला आहे.

यासंदर्भात आमदार देवयानी फरांदे यांनी महापालिकेच्या कामकाजावर टीका केली आहे. सार्वजनिक उपयोगाचे भूखंड आरक्षण बदलून दिले जात आहेत. शहरातील प्राईम लोकेशन वरील हे भूखंड खाजगी विकासकांना देण्याचे काम सुरू आहे.

महापालिकेने नुकतेच शहरातील मधुर स्वीट्स या गजबजलेल्या ठिकाणावरील एक भूखंड बीओटी तत्त्वावर हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. द्वारका भागातील महापालिकेचा मोठा भूखंड देखील अशाच प्रकारे देण्यात आला आहे. प्रशासकांनी यासंदर्भात २०२१ मध्ये ठराव मंजूर केली.

महापालिकेच्या उत्पन्नाच्या वाढीसाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यासाठी तीस वर्षाचा करार ९९ वर्ष करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे. यामध्ये शहराचे काहीही हित नाही, असा दावा आमदार पर्यंत यांनी केला.

शहरातील भूखंड बीओटी तत्त्वावर खाजगी विकासकांना देणे हे जनविरोधी आहे. त्यामुळे अशा प्रकारचे प्रस्ताव तातडीने रद्द करावे. शासनाने अशा प्रस्तावांना मंजुरी देऊ नये, असे पत्र आमदार परांदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

दोन दिवसांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच सत्ताधारी महायुती सरकारला भाजपा आमदाराने घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे हा विषय राजकीय चर्चेचा बनला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT