Congress Politics: अस्तित्व शोधणाऱ्या काँग्रेसला दुर्बुद्धी; नेत्यांमध्ये दुफळी, हर्षवर्धन सपकाळांच्या भूमिकेनं कार्यकर्ते नाउमेद!

Congress facing internal division Harshwardhan Sapkal role questioned: महापालिका निवडणुकीत भाजप विरोधी ऐक्याला बळ देणाऱ्या नेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याच्या चर्चेने नेत्यांचा संताप.
Harshwardhan Sapkal stand criticized
Harshwardhan Sapkal stand criticizedSarkarnama
Published on
Updated on

Congress leadership rift: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये नाशिकला सर्व विरोधक एकत्र आले. भाजप विरोधातील आघाडीची घोषणा एकदिलाने करण्यात आली. त्याला सर्वप्रथम काँग्रेसने अपशकुन केला आहे.

नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महायुतीच्या घटक पक्षांनी उमेदवार निश्चित केले आहेत. या घडामोडीत काँग्रेस कुठेच दिसत नव्हती.

या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या मनसेसह सर्व पक्षांचे नेते नाशिक शहरात एकत्र आले. त्यांनी भाजपच्या पराभवासाठी एक दिलाने काम करण्याचे घोषित केले. महाविकास आघाडीच्या घटपक्षांसह मनसे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षही यामध्ये सहभागी झाला.

Harshwardhan Sapkal stand criticized
BJP political strategy : राष्ट्रवादीच्या वाट्याला जास्त मुस्लिम मतदारसंघ; भाजपचा कुटील डाव झिरवळांनी सांगितला

सत्ताधारी महायुती आणि मंत्र्यांसह सर्व आमदार सर्व ताकदीनिशी निवडणुकीत उतरले आहे. सर्व नगरपालिका जिंकणार असा दावा भाजपने केला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष कुठेही दिसला नाही. मात्र नेत्यांमध्ये वादातून तो प्रकट झाला.

Harshwardhan Sapkal stand criticized
Nashik Politics : भाजपच्या अटीमुळे येवल्यात प्रॉब्लेम? समीर भुजबळ- गिरीश महाजन यांच्यात बंद दाराआड गुप्तगू..!

विरोधी ऐक्याची बैठक होताच अवघ्या पंधरा मिनिटांत सूत्रे फिरली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या बैठकीला उपस्थित नेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार असा संदेश दिला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

बैठकीला उपस्थित असलेले माजी नगरसेवक राहुल दिवे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी भाजपचा पराभव करणे हे आमचे ध्येय आहे. त्यासाठी विरोधी पक्षांनी अर्थात महाविकास आघाडीने बोलवलेल्या बैठकीला उपस्थित होतो. नगरपालिका निवडणुकीत विरोधकांची ताकद दाखवण्यासाठी आमचे काम सुरू असल्याचे सांगितले.

सपकाळ यांनी नोटीस बजावण्याचे संकेत देताच बैठकीला उपस्थित नेतेही सक्रिय झाले. त्यांनी जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. थोरात यांच्याकडे आपली भूमिका मांडली. सीपीएम आणि सीपीआय या पक्षांनी बैठकीला निमंत्रण दिले होते. त्यामुळे विरोधी ऐक्याच्या बैठकीला उपस्थित राहिल्याचे त्यांनी सांगितलं. आता यावरून काँग्रेस नेत्यांमधील नव्या वादाला तोंड फुटले आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, जिल्हा व महानगर प्रमुख, मनसेचे प्रदेश सचिव दिनकर पाटील, सलीम शेख, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष गजानन शेलार, माकपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ डी. एल. कराड, तानाजी जायभावे, भाकपचे राजू देसले आदी नेतेमंडळी या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी राजकीय आणि वैचारिक दृष्ट्या भाजप विरोधी भूमिका घेतली.

नाशिक शहरात काँग्रेस पदाधिकारी निद्रिस्त अवस्थेत आहे. संघटनेचा पत्ता नाही. महापालिका निवडणुकीत भोपळा फुटेल की नाही? यावर पैजा लागल्या आहेत. अशा स्थितीत काँग्रेसच्या नेत्यांनी घेतलेली भूमिका मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते.

बिहारच्या निवडणुका विचारात घेऊन काँग्रेस पक्षाने मनसे सोबत न जाण्याचा विचार केला असावा. हा त्यांच्या पक्षाचा धोरणात्मक विषय आहे. मात्र नाशिकमध्ये पक्ष चाचपडत असताना त्याला बळ देण्याऐवजी नाउमेद करण्याचे काम प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हेच करीत असतील तर पुढे काय होणार? हा नाशिक काँग्रेस पक्षासाठी चिंतेचा विषय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com