Satyajeet Tambe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Pune Nashik Railway : पुणे-नाशिक रेल्वेवर सरकारला सत्यजीत तांबेंचा इशारा; ‘25 दिवस झाले, समितीला माहितीच नाही’

Satyajeet Tambe claims the Kakodkar panel has completed 25 of its 60 days, but key railway information is still awaited : डॉ. अनिल काकोडकर समितीला 60 दिवसांची मुदत; 25 दिवस पूर्ण झाल्याचा दावा, सरकारच्या दिरंगाईवर तांबे नाराज

Pradeep Pendhare

Pune Nashik Semi High Speed Railway : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे संगमनेरमार्गे व्हावा, यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा सरकार दरबारी पाठपुरावा सुरू आहे. जब तक रेल दौड़ेगी नहीं, तब तक लड़ाई रुकेगी नहीं! असा इशारा देत, सत्यजीत तांबे यांनी सरकारने नेमलेल्या समितीबाबत मोठा खुलासा केला आहे.

डॉ. अनिल काकोडकर समितीला 60 दिवसाची मुदत दिली आहे, त्यातील 25 दिवस झाले आहे. तरी सरकारने समितीला रेल्वेविषयी माहिती दिलेली नाही, असा दावा आमदार सत्यजीत तांबे यांनी केला आहे.

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी मोठा लढा उभारला आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते पाठपुरावा करत आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, रेल्वेसाठी नेमलेल्या समिती आणि सरकारने तिला देण्याच्या माहितीवर, मोठा दावा केला आहे.

पुणे-नाशिक रेल्वे (Railway) ही सरळमार्गे व्हावी यासाठी, सत्यजीत तांबे यांनी विधिमंडळात अनेकदा मुद्दा उपस्थित केला आहे. यावर सरकारने तज्ज्ञ समितीने नेमण्याचे मान्य केले आहे. पण अनेक महिने होऊनही त्यावर काहीच हालचाली झाल्या नाहीत. यासाठी क्रांती दिनी, नऊ ऑगस्टला आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी सरकरने डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची घोषणा केली.

यानंतर रेल्वेसाठी जनआंदोलन छेडण्यात आले. यासाठी दोन प्रमुख मागण्या लावून धरण्यात आल्याकडे सत्यजीत तांबे यांनी लक्ष वेधले. पहिली मागणी म्हणजे समितीला 60 दिवसांची मुदत दिलेली आहे, त्यात कोणत्याही परिस्थितीत वाढ करायची नाही आणि दुसरी म्हणजे, समितीने फक्त कागदावरचे तांत्रिक मुद्दे न तपासता प्रत्यक्षात तालुक्या-तालुक्यात, गावा-गावात जाऊन जनभावना समजून घ्याव्यात. त्यावेळी आपल्या दोन्ही मागण्या सरकारने मान्य केल्या आणि तसे लेखी आश्वासन दिल्याचे सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे.

सरकारच्या दिरंगाईवर बोट

परंतु, समितीच्या 60 दिवसांच्या मुदतीतले 25 दिवस झाले आहेत. डॉ. काकोडकर यांच्याशी संपर्क साधून चर्चा देखील केली आहे. परंतु त्यांच्याकडून सरकारने अजूनही आवश्यक माहिती सादर झालेली नाही, असा खुलासा झाला आहे. सरकारच्या या दिरंगाईवर आपण निराश आहोत, आणि ही खूप चिंताजनक बाब आहे, असे सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे.

सात तालुक्यांचा प्रश्न

पुणे–अहिल्यानगर रेल्वे असो किंवा नाशिक–शिर्डी रेल्वेला विरोध नाही. पण त्यासाठी मूळ पुणे–नाशिक रेल्वे जी सरळमार्गाने जाणार होती, तिला वगळणे हे मात्र अन्यायकारक आहे. आज फक्त एकट्या संगमनेर तालुक्याचीच नाही, तर सिन्नर, अकोले, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्यातील लोकांची भावना सुद्धा अत्यंत तीव्र आहे. म्हणूनच पुढचे 35 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत, याकडे सत्यजीत तांबे यांनी लक्ष वेधले.

सत्यजीत तांबे यांचे आवाहन

प्रत्येकाने आपापला आवाज उठवावा, तो सरकारपर्यंत पोहोचववा, तसा प्रयत्न करावा, असे आवाहन करताना सरकारवर माझा विश्वास आहे, पण आपल्याला लढाई सुरूच ठेवावी लागणार आहे. पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे सरळमार्गे होईपर्यंत हा लढा थांबणार नाही, उलट दिवसागणिक हा संघर्ष आणखी तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करताना, "जब तक रेल दौड़ेगी नहीं, तब तक लड़ाई रुकेगी नहीं!" असे सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT