Ahilyanagar Railway Connectivity : अहिल्यानगरसाठी रेल्वेचे नवे जाळे? पुणे मार्गाचा DPR तयार, संभाजीनगर कनेक्टिव्हिटीला हिरवा कंदील

Major progress in two key railway connectivity projects for Ahilyanagar : 134 किमी पुणे–अहिल्यानगर मार्गाचे अंतिम स्थान सर्वेक्षण पूर्ण; 110 किमी संभाजीनगर मार्गाच्या FLS ला मंजुरी
Nilesh Lanke
Nilesh LankeSarkarnama
Published on
Updated on

Pune Ahilyanagar New Railway Line : अहिल्यानगरच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड समोर आली असून, पुणे-अहिल्यानगर या 134 किलोमीटरच्या नवीन रेल्वेमार्गाचा अंतिम स्थान सर्वेक्षण पूर्ण झाला आहे.

तसेच या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला आहे. दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर–अहिल्यानगर या 110 किलोमीटरच्या नवीन रेल्वेमार्गासाठी FLSला मंजुरी मिळाली आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी खासदार नीलेश लंके यांनी 2024पासून सातत्याने पाठपुरावा करत होते.

खासदार लंके (Nilesh Lanke) यांनी अहिल्यानगरच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीचा प्रश्न सातत्याने केंद्र सरकारच्या पातळीवर लावून धरला. रेल्वे मंत्रालयाशी आणि रेल्वे समितीच्या बैठकींमध्ये सक्रिय सहभाग घेत प्रकल्पांची सद्यस्थिती, सर्वेक्षण, डीपीआर आणि पुढील कार्यवाहीचा आढावा घेतला.

पुणे-अहिल्यानगर रेल्वेमार्गाचे (Railway) अंतिम स्थान सर्वेक्षण पूर्ण होणे हा प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. सर्वेक्षण पूर्ण झाल्याने प्रकल्पाच्या प्रशासकीय व मंजुरी प्रक्रियेला पुढे जाण्यास आवश्यक असलेली दिशा स्पष्ट झाली आहे. या मार्गामुळे अहिल्यानगरला पुणे शहराशी अधिक सक्षम रेल्वे संपर्क मिळण्यास मदत होणार आहे.

Nilesh Lanke
Nashik Pune Railway via Sangamner : नाशिक–पुणे रेल्वेमार्ग संगमनेर मार्गेच होणार? मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचा अमोल खताळांचा दावा

याचबरोबर छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर 110 किलोमीटरच्या नवीन रेल्वेमार्गासाठी अंतिम स्थान सर्वेक्षणाला मंजुरी मिळाल्याने या प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेलाही गती मिळण्याची अपेक्षा आहे. अंतिम स्थान सर्वेक्षणच्या आधारे पुढील टप्प्यात डीपीआर आणि आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

Nilesh Lanke
Belapur Parli Railway Project : '104 वर्षे झाली, निर्णय कधी?' बेलापूर-परळी रेल्वे मार्गावर लोकसभेत प्रश्न; केंद्राने दिले महत्त्वाचे अपडेट

प्रवास थांबणार नाही

खासदार नीलेश लंके म्हणाले, "2024मध्ये खासदार झाल्यापासून पुणे-अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर रेल्वेमार्गांसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. पुणे-अहिल्यानगर रेल्वेमार्गाचा अंतिम स्थान सर्वेक्षण पूर्ण झाल्याची आणि छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर रेल्वेमार्गाच्या अंतिम स्थान सर्वेक्षणला मंजुरी मिळाली." ही समाधानाची बाब असली, तरी हा प्रवास येथे थांबणार नाही. प्रत्यक्ष रेल्वेमार्गाचे काम सुरू होऊन त्याचा लाभ जनतेला मिळेपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रेल्वे प्रकल्पांवर पाठपुरावा

दरम्यान, अहिल्यानगरच्या रेल्वे विकासासाठी इतर महत्त्वाचे प्रकल्पही सुरू आहेत. दौंड–मनमाड 236 किलोमीटर रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण होऊन ते कार्यान्वित झाले आहे. अहिल्यानगर–बीड–परळी वैजनाथ या 261 किलोमीटरच्या नवीन रेल्वेमार्गाच्या अहिल्यानगर-बीड-बडवाणी या 201 किलोमीटरच्या भागाचे काम सुरू असून, प्रकल्पाच्या उर्वरित कामातही प्रगती होत आहे. या प्रकल्पाची किंमत सुमारे 5800 कोटी रुपये आहे. याशिवाय धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या 240 किलोमीटरच्या नवीन रेल्वेमार्गासाठीही अंतिम स्थान सर्वेक्षणला मंजुरी देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com