Nilesh Ghaywal controversy Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Ghaywal controversy : घायवळच्या मामाची धमाकेदार 'एन्ट्री'; रोहित पवारांच्या 'पाॅलिटिक्स'वर संतापले! अनिल देशमुखांचंही नाव घेतलं

Janakiram Gaikwad Denies Rohit Pawar Allegations in Jamkhed : पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याची बाजू घेताना, त्याचे जामखेडमधील मामा जानकीराम गायकवाड यांनी मोठा गौप्यस्फोट केला.

Pradeep Pendhare

Ahilyanagar political news : पुण्यातील कुख्यात गुंड नेमकं कोणत्या राजकीय नेत्याचं पाठबळ यावरून वादंग सुरू आहे. नीलेश घायवळ आणि सचिन घायवळ हे दोघे बंधू अहिल्यानगरच्या सोनेगांव (ता. जामखेड) मुळगाव आहे. इथं त्यांचा बंगला आणि शेती आहे.मात्र आईवडिल आणि पत्नीसह घायवळ कुटुंबाचे वास्तव्य पुण्यात आहे.

नीलेश घायवळ याचे पुणे, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील गुन्हेगारीचे कारनामे चर्चेत असतानाच, कोथरूड इथं गोळीबारामुळे पुन्हा चर्चेत आला. परदेशात पसार झालेला नीलेश घायवळ आणि त्याच्या बंधूंचे राजकीय कनेक्शन देखील चर्चेत आलं आहे. या वादावर घायवळ बंधूंचे जामखेडमधील मामा जानकीराम गायकवाड यांनी प्रतिक्रिया देत, खळबळ उडवून दिली आहे.

घायवळ बंधूंचे मामा जानकीराम गायकवाड म्हणाले, "नीलेश आणि सचिन बंधूंवर जे काही आता आरोप सुरू आहेत, ते सर्व खोटे आहेत. त्यांचा कुठेही संबंध नाही. पुण्यातील (Pune) गोळीबार प्रकरणात नीलेश घायवळ याचे नाव घेतलं गेल. पण तो नऊ तारखेला बाहेरगावी गेला आहे. सही झाली आहे 17 तारखेला." हे ज्यांनी केलं आहे, त्यांचा अन् नीलेश घायवळ यांचा काहीच संबंध नाही. दोस्तसुद्धा नाही. पण खोटंनाटं करून त्याला गुंतवण्याचा प्रकार सुरू आहे, असा आरोप जानकीराम गायकवाड यांनी केला.

'सचिन घायवळ याला जामखेडमधून जिल्हा परिषदेला उभं राहायचं आहे. खर्डा गटातून तो उभा राहाणार आहे. ही जागा आम्हीच जिंकणार हे 101 टक्का माहिती आहे. यातूनच समोरच्यांना त्रास होऊ लागलं आहे. यांना बंद केलं म्हणजे, आपण घेणार, असं आहे. रोहित पवार (Rohit Pawar) हे सर्व करत आहे,' असा गंभीर आरोप जनकीराम गायकवाड यांनी केला.

'नीलेश घायवळ याला अमरावती तुरूगांतून यांनीच सोडला. 'मकोका' होता. मला विचारलं होतं, मामा कोणत्या जेलमध्ये आहे. तर मीच सांगितलं होतं, अमरावतीच्या! त्यावेळी त्याला कोणी बाहेर काढला. त्यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख होते. देशमुख आणि पवारांनी त्याला बाहेर काढला होता. चौकशी केल्यावर कोणी मदत केली. कोण वकील होता. लखोटा कोणाचा होता. पैसे कोणी भरले. सर्व यांनी केलं असल्याचा दावा,' जानकीराम गायकवाड यांनी केला आहे.

'नीलेश घायवळ सुटल्यानंतर आम्ही रोहित पवार यांच्याबरोबर काम केलं. 43 हजार मतांनी निवडून आला. निवडून आल्यानंतर वाकडं सुरू झालं. सौर प्लांटवरून अधिक वाद वाढले. त्यातून आणखी विरोध सुरू झाला. जामखेडमध्ये टँकरद्वारे पाणी वाटप केले. दोस्त मंडळी नीलेशच्या मागे जास्त होती. हेच यांना खडकत होतं,' असे जानकीराम गायकवाड यांनी सांगितलं.

शिंदे-पवार आरोप-प्रत्यारोप

परदेशात पसार झालेला पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ आणि विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेंचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये गुंड नीलेश घायवळ हा राम शिंदेंच्या पाया पडताना दिसत आहे. त्याच पद्धतीने विधानसभा निवडणुकीच्या वेळी नीलेश घायवळ हा राम शिंदेंच्या प्रचारामध्ये भाषण करतानाही दिसत आहे. त्यामुळे नीलेश घायवळ आणि राम शिंदेंचे राजकीय संबंध समोर असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. त्यावर भाजपने रोहित पवार यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. 'यह रिश्ता क्या कहलाता है?' म्हणत सचिन घायवळ आणि रोहित पवार यांचे फोटो पोस्ट केले आहेत.

घायवळ बंधू यामुळे 'रडार'वर

जिल्हा परिषदेसाठी जामखेडच्या खर्डा गटातून इच्छुक असलेल्या सचिन घायवळ याने शस्त्र परवाना थेट मंत्रालयातून मंजूर करून घेतला. हे प्रकरण आता तापलं आहे. त्याचाच बंधू नीलेश घायवळ याने पासपोर्ट काढताना आधारकार्ड, पॅनकार्ड, भाडे करारनामा बनावट दिल्याचं समोर आलं. या दोघा घायवळ बंधूंच्या प्रताप राजकीय कनेक्शनशिवाय पूर्ण होत असल्याने आरोपांच्या फैरी सुरू आहे. यात कोणाची विकेट जाते, याची उत्सुकता आहे.

घायवळ बंधूंचे पाॅलिटिक्स कनेक्शन

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे आमदार संतोष बांगर, माजी मंत्री आमदार तानाजी सावंत आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम, भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी घायवळ बंधूंचे कनेक्शन जोडले गेल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT