Radhakrishna Vikhe Vs Balasaheb Thorat sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Vs Balasaheb Thorat : मंत्री विखेंनी थोरातांना दिले चॅलेंज; साई मंदिरात येणार का समोरासमोर?

A political conflict broke out between Radhakrishna Vikhe and Balasaheb Thorat : महसूल पंधरवडा निमित्ताने मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते नगर जिल्ह्यातील 190 नवनियुक्त तलाठ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली. यावेळी तलाठी भरतीवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार रोहित पवार यांचा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी चांगलाच समाचार घेतला.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : राज्याचे महसूल तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेस नेते माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधलाय.

"तलाठी पदभरती भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणाऱ्या माजी महसूलमंत्र्यांनी त्यांच्या काळात महसूल विभागातील बदल्या करण्यासाठी 'रेटकार्ड'च छापले होते", असा खळबळजनक आरोप राधाकृष्ण विखे यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता केला.

तलाठी पदभरतीत भ्रष्टाचार झाल्याचे वारंवार आरोप करणाऱ्या माजी महसूलमंत्र्यांनी साईबाबाच्या मंदिरात येऊन भ्रष्टाचार झाल्याचे शपथेवर सिद्ध करून दाखवावे. सिद्ध झाल्यास मी राजकारणातून बाजूला होईल. सिद्ध नाही झाले, तर त्यांनी राजकारणातून बाजूला व्हावे, असे चॅलेंज काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले.

महसूल पंधरवडा निमित्त नगरमध्ये तलाठी पदावरील 190 उमेदवारांना नियुक्तीचे पत्र महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. राज्यात आज 4 हजार 600 उमेदवारांना तलाठी पदावरील नियुक्तीचे पत्र देण्यात आले. जिल्ह्यातील दोन महाभागांनी त्यामध्ये एक माजी महसूल मंत्री आणि एक आमदार रोहित पवार यांनी तलाठी पद भरतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. आरोप करणाऱ्या आमदारावर आम्ही कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतला होता. परंतु ही भरती अत्यंत पारदर्शकपणे पार पडली व नियुक्तीपत्र उमेदवारांना दिले गेले. याचे मला समाधान आहे. तसेच ही आरोप करणाऱ्या दोघांना चपराक देखील आहे, असे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी म्हटले.

आरोप करून व्यवस्थेला बदनाम केले गेले. त्यासाठी काहींनी आघाडीच उघडली होती. यात उमेदवार देखील बदनाम झाले. परंतु पारदर्शकतेसमोर काहीच टिकले नाही. संपूर्ण प्रक्रिया व्यवस्थित पार पडली, असा दावा मंत्री विखे यांनी करत, आरोप करणाऱ्या माजी महसूलमंत्र्यांचा चांगला समाचार घेतला.

'रेटकार्ड'चा आरोप

या मंत्र्यांच्या काळात प्रांताधिकारी, तहसीलदार, तलाठी यांच्या बदल्यांचे 'रेटकार्ड'च ठरले होते. तसेच छापलेच गेले होते. ज्यांच्या हात भ्रष्टाचाराने बरबटले आहेत, तेच आरोप करत होते. आरोप करणाऱ्या माजी महसूलमंत्र्यांनी साईबाबांच्या मंदिरात यावे. मीही येतो. शपथेवर त्यांनी भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध करावे. सिद्ध केल्यास मी राजकारणातून बाजूला होईल. सिद्ध झाले नाही, तर त्यांनी राजकारणातून बाजूला व्हावे, असे चॅलेंज महसूल मंत्री विखे यांनी बाळासाहेब थोरात यांना दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT