Sujay Vikhe And Shivaji Kardile
Sujay Vikhe And Shivaji KardileSarkarnama

Sujay Vikhe And Shivaji Kardile : हुश्श! विखे-कर्डिले संघर्ष टळला; सुजय विखेंनी निर्णय बदलला

Sujay Vikhe reversed the decision and relieved Shivaji Kardile : माजी खासदार सुजय विखे यांनी राहुरी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले. हा निर्णय घेऊन सुजय विखे यांनी शिवाजी कर्डिले यांच्याशी होणारा राजकीय संघर्ष टाळला आहे.
Published on

Ahmednagar News : माजी खासदार सुजय विखे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असून संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदारसंघ माझ्यासमोर पर्याय असल्याचे सांगितले होते. सुजय विखे यांच्या या भूमिकेमुळे त्यांचे ज्येष्ठ सहकारी भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची कोंडी झाली होती. त्यावर सुजय विखे यांनी भूमिका स्पष्ट करत कर्डिलेंना काहीसा दिलासा दिला.

"राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजी कर्डिले हेच उमेदवार असतील आणि त्यांच्या विजयासाठी आता मी देखील प्रयत्न करणार आहे", असे सुजय विखे यांनी म्हटले आहे. सुजय विखे यांनी ही भूमिका संगमनेर तालुक्यातील बैठक मांडली.

भाजपचे (BJP) उमेदवार सुजय विखे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी चाचपणी सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी करत असल्याचे म्हटले होते. सुजय विखे यांच्या या भूमिकेमुळे शिवाजी कर्डिले यांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यामुळे कर्डिले-विखे यांच्यात पुन्हा राजकीय दरी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु सुजय विखे यांनी राहुरी मतदारसंघाविषयी त्यांची भूमिका बदलली आहे. त्यांनी शिवाजी कर्डिले यांना पाठिंबा देत, त्यांच्या विजयासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे म्हटले आहे.

Sujay Vikhe And Shivaji Kardile
Ram Shinde Vs Namdev Raut : आमदार शिंदे चिंचोक्याचाच कारखाना काढू शकतात; जुन्या सहकाऱ्यानं हाणला टोला

"नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवत असताना माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यामुळे नगर-राहुरी विधानसभा मतदारसंघातून चांगले मताधिक्य मिळाले. नगर दक्षिणमध्ये राजकारण करत असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारण करत आलो. त्यांच्या नेतृत्वाच्या आधीन राहून मी काम करणार आहे. त्यामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजी कर्डिले हेच उमेदवार असतील", असे सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी सांगितले.

Sujay Vikhe And Shivaji Kardile
Balasaheb Thorat Vs Radhakrishna Vikhe : दहशतीचं राजकारण केल्यास, 'याद राखा'; थोरातांचा विखेंना इशारा

विधानसभा निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. सुजय विखे यांनी विधानसभा लढविण्याबाबत वक्तव्य करत आहेत. संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करत पक्षाकडे याबाबत इच्छा व्यक्त केली आहे. 2019 आणि 2024 लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांना राहुरी विधानसभा मतदार संघातून मोठे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे सुजय विखे पाटील राहुरी मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत उतरतील, असा अंदाज होता. मात्र दुसर्‍या दिवशी सुजय विखे राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या विधानावर घुमजाव केले.

सुजय विखे यांनी राहुरी मतदारसंघांचा विषय सोडून दिल्यानं, त्यांनी संगमनेरवर लक्ष्य केल्याचे दिसते. तशा संगमनेरमध्ये बैठकांचा त्यांनी जोर वाढवला आहे. तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यात यावरून जुंपली आहे. एकमेकांच्या घरण्याचे राजकीय छंद बाहेर काढू लागले आहेत. त्यामुळे सुजय विखे यांच्या संगमनेरच्या निर्णयाला भाजप किती बळ देते हे पाहण्याचे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com