Radhakrishna Vikhe constituency crime 1 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe constituency crime : ‘टेंडर’वरून थेट पिस्तुल! मंत्री विखेंच्या मतदारसंघात समर्थक नगरसेवकाला धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ

Police register case after Rahata municipal councillor Dashrath Tupe allegedly receives death threats at gunpoint in Guardian Minister Radhakrishna Vikhe Patilconstituency : राहाता नगरपालिकेतील पालकमंत्री विखे पाटील समर्थक नगरसेवकाला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याच्या धमकीचा प्रकारानं खळबळ उडाली आहे.

Pradeep Pendhare

Rahata municipal councillor threat case : भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहाता मतदारसंघातील वाढत्या गुन्हेगारीची खळबळजनक घटना घडली आहे.

राहाता नगरपालिकेतील माजी खासदार सुजय विखे पाटील समर्थक नगरसेवकाला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी नगरसेवक दशरथ तुपे यांच्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे.

राहाता शहराचे ग्रामदैवत श्री वीरभ्रद यात्रा आहे. या यात्रेनिमित्ताने पाळण्याचं टेंडर दुसऱ्याला दिल्याच्या कारणावरून थेट नगरसेवकाला पिस्तुलाचा धाक दाखवत, जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार राहाता इथं घडला. राहाता नगरपालिकेतील सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांचे निकटवर्तीय नगरसेवक दशरथ तुपे यांच्याबाबत हा प्रकार घडला.

राहाता नगरपालिका भाजप (BJP) नगरसेवक दशरथ तुपे यांना तुषार सदाफळ याने फोनवरून, तसेच चौकात जमाव जमवून पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. नगरसेवकाला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याच्या धमकीची वार्ता राहाता शहरात वाऱ्यासारखी पसरली.

यानंतर राहाता नगरपालिकेचे नगराध्यक्ष स्वाधीन गाडेकर आणि सर्व नगरसेवकांनी धाव घेत, या घटनेचा निषेध केला. पोलिस निरीक्षकांना निवेदन देऊन संबंधितावर कठोर कारवाई करण्याची आणि नगरसेवक तुपे यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली.

राहाता शहराचे ग्रामदैवत श्री विरभद्र यात्रेनिमित्त पाळण्याचे टेंडर दिले नाही, याचा राग मनात धरून तुषार सदाफळ याने थेट नगरसेवक तुपे यांना धमकी दिली. शिवीगाळ करत स्वतःचा परवानाधारक बंदुकीचा धाक दाखवून, तुषार सदाफळ याने जीवे मारण्याची धमकी दिली, अशी नगरसेवक दशरथ तुपे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

व्यापाऱ्यांमध्ये दहशत

तुषार सदाफळ हा परवानाधारक बंदुकीच्या जोरावर नेहमीच शहरातील व्यापाऱ्यांवर दहशत निर्माण करतो. यात्रेच्या टेंडर प्रक्रियेत माझा काहीही संबंध नसताना मला जीवे मारण्याची धमकी दिली. मला आणि माझ्या कुटुंबाला तुषार सदाफळ याच्यापासून धोका असल्याने त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नगरसेवक तुपे यांनी पोलिसांकडे केली आहे.

तुषार सदाफळ धमकी देऊन पसार

दरम्यान घटनेनंतर तुषार सदाफळ हा पसार झाला असून राहाता पोलिस त्याचा शोध घेत आहेत. विखे पाटलांच्या निकटवर्तीय नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने राहाता तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT