Chhagan Bhujbal & Rahul Gandhi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rahul Gandhi News : भुजबळ यांनी भाजपच्या `ओबीसी` आंदोलनाची हवाच काढली

छगन भुजबळ म्हणाले, `मोदी` म्हणजे सगळे `ओबीसी` असे अजिबात नाही. राहुल गांधी प्रकरण भाजपसाठी बुमरँग झाले असुन ओबीसी आणि राहुल गांधी यांच्या विधानाचा काडीमात्र संबंध नाही.

Sampat Devgire

नाशिक : (Nashik) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी उल्लेख केलेले मोदी आणि ओबीसी (OBC) यांचा काडीचही संबंध नाही. देशात अनेक मोदी असुन ते विविध धर्मांचे आहेत. त्यामुळे `ओबीसी` समाजाचा अवमान झाला ही वस्तुस्थिती नाही. यासंदर्भात भाजपने (BJP) खेळलेला डाव त्यांच्याच अंगलट येईल. हे प्रकरण बुमरँग झाले असुन राहुल गांधी यांना देशभर सहानुभूती मिळत आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला. (BJP`s game with Rahul Gandhi will be Boomerang on Themselves)

सध्या देशभर राहुल गांधी यांच्यावर लोकसभेने केलेली कारवाई व भारतीय जनता पक्षाने त्या विरोधात भाजपकडून सुरु असलेले `ओबीसी` आंदोलनाच्या प्रकरणातील हवाच श्री. भुजबळ यांनी काढून घेतली. ते म्हणाले राहुल गांधी आणि अडानी प्रकरणाशी `ओबीसी`चा काहीच संबंध नाही. आता राहुल गांधी प्रकरण भाजपच्याच अंगलट येईल, असा दावा त्यांनी केला.

श्री. भुजबळ नाशिक येथे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, कोण डरपोक वगैरे हा प्रश्न बाजुला ठेवा.मात्र भाजपने टाकलेला हा डाव पुर्णपणे बुमरँग होतो आहे. ती राजकीय चाल पुर्णतः चुकलेली आहे. देशातील सर्व राजकीय पक्ष राहुल गांधींना पाठींबा देत आहेत.

राजकीय नेते आपल्या भाषणात अनेकदा काही काही बोलतच असतात. राहुल गांधी यांनी उल्लेख केला ते दोन चार लोक मोदी आहेत, हे खरेच आहे. अनेक मोदी राजकारणाच देखील होते. पिलु मोदी मोठे राजकारणी होते. रुसी मोदी हे टाटा समुहाचे प्रमुख होते. ते सर्व पारसी समाजाचे आहेत. मोदी आडगाव म्हणजे सगळे `ओबीसी`च आहेत, त्यामुळे सर्व ओबीसी घटकांनी रागवायला पाहिजे असे काहीच नाही.

राहुल यांनी उल्लेख केलेले `ते` मोदी काही हजार कोटी रुपये घेऊन देश सोडून गेले, मग कोणी काही बोलायचे नाही का? असं कसं चालेल. ते बोलले असतील, त्यातून ताबडतोब न्यायालयात जायचे?. नाशिक शहरात भद्रकालीत एखादी घटना घडली तर अंबडचे पोलिस केस घेत नाही. ते सांगतात, जा तुम्ही भद्रकालीला. ही घटना झाली कुठे तर कर्नाटकात. केस केली सुरतला. अहो केस करायचीच तर कर्नाटकात करा ना केस. त्यातही अनेक वेळा न्यायाधीश बदलले. त्यानंतर एक न्यायाधीश आले आणि फटदिशी निकाल दिला. दुसऱ्या दिवशी ताबडतोब राहुल गांधी लोकसभेच्या बाहेर.

शेवटी मला एव्हढेच सांगायचे आहे की, जनतेचे कोर्ट हे सगळ्यात मोठं कोर्ट असतं. इंदिरा गांधी यांना देखील मोरारजी देसाई यांच्या काळात असाच त्रास देण्यात आला. अटक झाली. बरेच काही झाले. सगळ्या गोष्टी झाल्या. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा जनतेने श्रीमती इंदिरा गांधींना सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडूण दिले.

इंदिरा गांधी यांचा हा इतिहास आपल्या समोर आहे. असे असताना कुणाला वाटत असेल की राहुल गांधींचे तोंड बंद करा, त्यांना लोकसभेच्या बाहेरच काढुन टाका, तर हे कुणालाही आवडणार नाही असे मला वाटते. ते कोणाला आवडेल असे मला वाटत नाही. या प्रकरणानंतर अगदी सगळे विचारवंत देखील राहुल गांधी यांच्या बाजुने जोरात बोलत आहेत.

ब्रिटीश देखील त्यावेळेला जे कोणी विरोधात असतील, महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल असतील त्यांना नमवू शकले नाहीत. त्यांना संपवू शकले नाही. हा भारत देश आहे. हा सव्वाशे कोटींचा देश आहे हे लक्षात ठेवा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT