Nashik News : संसदेत सत्ताधारी भाजपने महिला आरक्षण विधेयकावरून राजकारण तापवले. आता हे राजकारण रस्त्यावर देखील पोहोचले आहे. काँग्रेस नेते राहुल राहुल गांधी बुधवारी नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. ही संधी साधत भाजपने नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
राहुल गांधी आज नाशिकला दाखल झाले. पक्षाच्या जिल्हाध्यक्षांचा दहा दिवसीय प्रशिक्षण वर्गाचा समारोप त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यांच्याकडून शहरात सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थी आंदोलनालाही पाठिंबा देण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी अनपेक्षितपणे राहुल गांधी यांच्या दौऱ्याचा निषेध केला. भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय समोर जमले. त्यांनी राहुल गांधी यांच्या दौऱ्याचा विरोध केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महिला आरक्षण विधेयकाला संसदेत विरोध केला. राहुल गांधी हे महिला विरोधी राजकारण करीत आहे. त्यामुळे महिलांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत भाजपने त्यांचा निषेध केला.
भाजपचे नगरसेवक आणि नेते काळे कपडे घालून राहुल गांधी यांचा निषेध करणार होते. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेल्या भाजपच्या काही नगरसेवकांनी पांढरे शुभ्र कपडे घालून आंदोलनात भाग घेतला. त्यामुळे त्यांचे हे कपडे चर्चेचा विषय ठरले.
महिला आरक्षण विधेयक गेले काही दिवस देशात भाजप विरुद्ध विरोधी पक्षांमध्ये राजकीय वादाचा विषय ठरले आहे. सत्ताधारी भाजप महिला विरोधकाच्या आडून डिलिमिटेशन बिल आणू पाहत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी भाजपला कडाडून विरोध केला.
महिला विधेयकाला काँग्रेसचा विरोध राजकीय हेतूने असल्याचा भाजपचा आरोप आहे. काँग्रेस पक्ष सातत्याने महिला विरोधी भूमिका घेत आहे. या पक्षाचे राजकारण प्रतिगामी असल्याने भाजपने राहुल गांधी यांचा निषेध केला.
एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दौरा आणि त्याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन अशी स्थिती होती. त्यामुळे भाजप विरुद्ध काँग्रेस राजकारणाचा हा अंक चांगलाच रंगला. काळे कपडे घालून भाजपने राहुल गांधी यांच्या विरोधात दिलेल्या घोषणा चर्चेचा विषय ठरल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.