Nilesh Lanke and Rahul Gandhi
Nilesh Lanke and Rahul Gandhi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke News : नीलेश लंकेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राहुल गांधी अहमदनगरमध्ये येणार?

सरकारनामा ब्यूरो

Loksabha Election 2024 : अहमदनगर लोकसभा मतदार संघामध्ये महायुतीकडून विद्यमान खासदार सुजय विखे यांनाच पुन्हा लोकसभेची उमेदवारी दिली गेली आहे, तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या नीलेश लंके यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

राज्यातील काही महत्त्वपूर्ण लढतीपैंकी या ठिकाणची सुद्धा लढत रंगतदार होणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, नीलेश लंके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विशेष म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंकेंडूनच ही माहिती समोर आल्याचे सांगितले जात आहे. मात्र उमेदवारी दाखल करण्याची तारीख अद्याप निश्चित झाली नसून, लवकरच तारीख जाहीर होणार आहे. नीलेश लंकेंच्या स्वाभिमानी जनसंवाद यात्रेचा उद्या समारोप होणार आहे. याप्रसंगी अहमदनगरमध्ये शरद पवार, आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अहमदनगर लोकसभा निवडणुकीसाठीची प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया गुरुवारपासून (ता. 18) सुरू झाली आहे. 18 ते 25 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. तर 26 एप्रिलला अर्जांची छाननी होणार असून, 29 एप्रिलपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे आणि 13 मे रोजी मतदान होणार आहे. यानंतर तीन आठवड्यांनी म्हणजे चार जूनला मतमोजणी होईल. अहमदनगरची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी 16 मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या बंधनामुळे निवडणूक अधिकार्‍यांच्या दालनात शक्तिप्रदर्शन करण्यावर निर्बंध आहेत. केवळ तीन वाहनांतून उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी यावे लागणार आहे. निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या दरानुसारच उमेदवारांना दैनंदिन खर्च सादर करावा लागणार आहे. या खर्चाचे स्वतंत्र यंत्रणेमार्फत ऑडिट होणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT